Download App

आता कुठलं मंत्रिपद नको अन् मुख्यमंत्रिपदही नको; छगन भुजबळांची थेट भूमिका

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Chhagan Bhujbal On Maratha Reservation : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंत्रिपद वगैरे याची पर्वा करत नाही. मी आमदारकीची देखील परवा करत नाही. तसेच आता मला कोणतही मंत्रिपदही नको आणि मुख्यमंत्रिपद नकोय. अशी भूमिका घेतली. आज (6 जानेवारी) पंढरपूरमध्ये ओबीसी समाजाकडून ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छगन भुजबळ बोलत होते.

साडेचार लाख वेतन, विमान प्रवास अन् बरंच काही… मराठा आरक्षण सल्लागार मंडळाला ‘क्लास वन’ सुविधा

भुजबळ म्हणाले की, लोक मला विचारतात की, भुजबळसाहेब तुम्ही मंत्रिमंडळात आहात. मी मंत्रिमंडळात सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर आरक्षणासंदर्भात जे काय बोलायचं ते बोलतच आहे. माध्यमांमधून देखील ते तिथपर्यंत पोहोचत आहे. मला म्हणतात मंत्रिपदाचा राजीनामा का देत नाही? असे सवाल विचारला जातो.

‘रोहित पवार बच्चा, मी उत्तर द्यावं इतका तो मोठा झाला नाही…’; अजितदादांची खोचक टीका

मंत्रिपद वगैरे याची पर्वा करत नाही. मी आमदारकीची देखील परवा करत नाही. तसेच आता मला कोणतही मंत्रिपदही नको आणि मुख्यमंत्रिपदही नकोय. पण गोरगरिबांची काळजी घेणारं सरकार या महाराष्ट्रात आलं पाहिजे. त्यासाठी आम्ही आकाश पातळ एक करत आहोत. असं म्हणत भुजबळांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये हस्तक्षेप करण्यात येऊन नये. अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळनार नाही म्हणजे नाही
तो ओबीसी आयोग आहे की, मराठा आयोग आहे. याबद्दल माझ्या मनात शंका आहे. कारण ओबीसी आयोगातील पूर्वीच्या सर्व लोकांनी राजीनामे दिले आहेत. आता नवीन आलेल्या लोकांना काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणावर काम करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र आमचा मराठा आरक्षणाला विरोध नसून आरक्षणाच्या नावाखालीच सुरू असलेल्या झुंडशाहीला आमचा विरोध आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही.आरक्षणाला विरोधच म्हणजे विरोधच असं म्हणत यावेळी भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

follow us

वेब स्टोरीज