Download App

आषाढीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी घेतलं विठुरायाचे दर्शन, ‘वारकऱ्यांची जबाबदारी सरकारची’

  • Written By: Last Updated:

Ashadhi Wari 2023 : एक महिन्यापूर्वी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत सर्व प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. यावर्षीची आषाढी वारी नियोजनबद्ध झाली पाहिजे, कोणत्याही वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये अशा प्रकारच्या सूचना आणि नियोजन करण्याचे प्रशासनाला सांगितले होते. आता आम्ही आल्यावर पाहिले आणि समाधान वाटले. अनेक ठिकाणी आषाढीला चिखल असतो तिथं आता सिमेंट रस्ता आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथे अचनाक भेट देऊन आषाढी वारीचा आढावा घेतला. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की पंढरपूरमधील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. डांबरी रस्ते झाले पाहिजेत यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे. दर्शनासाठी वारकऱ्यांची रांग लागते तिथं त्यांना त्रास होऊ नये यासाठी मंडप उभा केलेला आहे. पाऊस आणि ऊनापासून संरक्षण व्हावं याची काळजी घेतली आहे. हे सगळं नियोजनबद्ध केले आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

Supriya Sule : धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत संसदेत आवाज उठवणार

पिण्याचे स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे, ठिकठिकाणी पंखे लावण्यात आले आहेत, महिलांसाठी स्नानगृह मोठ्या प्रमाणात उपलब्ध केली आहेत, चेजींग रुम आहेत, टॉलेटची व्यवस्था केली आहे. वारीच्या काळात स्वच्छतेला प्राधन्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

‘कर्नाटक मॉडेल महाराष्ट्रात लागू करा’, सिद्धरामय्यांनी दिला शरद पवारांना प्लॅन

वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी येणार आहेत. त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही. तसेच त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. अनेक ठिकाणी कॅम्प लावण्यात आले आहेत. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेतली आहे. कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची काळजी घेतली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Tags

follow us