Download App

पाचच दिवसांनी शिंदे-फडणवीस पुन्हा नगरला; निळवंडेतील पाणी सोडण्याची चाचणी

  • Written By: Last Updated:

समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीन दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगर शहरात आले होते. आता पुन्हा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ३१ मे रोजी नगर जिल्ह्यात दोन ठिकाणी येणार आहेत. ३१ मे रोजी चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला दोघे येत आहेत. त्यानंतर निळवंडे धरणातून डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या चाचणीसाठी दोघेही येत आहेत.

निळवंडे धरण : राजकारणाचे बांध फोडून अखेर पाणी वाहणार ! जाणून घ्या इनसाईड स्टोरी

निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचे चाचणीच्या कार्यक्रमाला फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच येणार होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे. पाच तालुक्यांचे लाभक्षेत्र असलेल्या या निळवंडे धरणासाठी शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. प्रकल्प मार्गी लागावा म्हणून राज्यात सत्तेवर असलेल्या त्या काळातील सरकारचे सहकार्य मिळाले. शेतकऱ्यांनी पाण्यासाठी मोठा संघर्ष केला. पाण्याची असलेली प्रतिक्षा आता पाणी सोडण्याच्या चाचणीमुळे संपणार असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा क्षण महत्वपूर्ण ठरेल. असा विश्वास महसूलमंत्री विखे यांनी व्यक्त केला.

महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले की, येत्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही दौरा होणार असल्याने त्याचेही नियोजन या कार्यक्रमातून सुरू करण्याचा प्रयत्न होणार आहे. मागील दोन दिवसांपासून अकोले, राहाता, संगमनेर या तालुक्यात कालव्यांची काम सुरू असलेल्या गावांना आपण भेटी देवून पाहणी केली असून शेतकऱ्यांच्या भावनाही जाणून घेतल्या आहेत. कालव्याच्या कामातील त्रृटी दूर करण्याबाबत जलसंपदा महसूल विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. धरणाच्या उजव्या कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल असा विश्वास व्यक्त करून उद्दिष्ट ठेवूनच ही काम पूर्ण करण्याबात विभागाने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे महसूलमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

Tags

follow us