सांगली : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची शिवशक्ती परिक्रमा (Shiv Shakti Parikrama) यात्रा सांगली जिल्ह्यात पोहोचताच इस्लामपूरमध्ये यात्रेच्या नियोजनातील गोंधळ समोर आला. पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी भाजपचे काही कार्यकर्ते थांबले असतानाच त्यांचा मुडे यांचा ताफा थेट कोल्हापूरकडे रवाना झाला. त्यामुळं स्वागतासाठी ताटळकत उभे असलेले कार्यकर्ते नाराज झाले. दरम्यान, या गोंधळाबद्दल मुंडे यांनी कार्यकर्त्यांची माफी मागून यावर पडदा टाकला.
https://www.youtube.com/watch?v=Qbcr-Nl3sTI
पंकजा मुंडे या श्रावण महिन्याचे औचित्य साधून धार्मिक स्थळांना भेटी देत आहेत. त्या साडेतीन शक्तीपीठांची शक्ती परिक्रमा यात्रा करत आहेत. या यात्रेचा सांगली जिल्ह्यातील विट्यात प्रवेश झाला. विट्यानंतर त्यांचा इस्लामपूर दौरा होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांचा ताफा दुसऱ्याच मार्गाने कोल्हापूरकडे रवाना झाला. शिवाजी चौकात त्यांच्या स्वागतासाठी विक्रम पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, महेश पाटील आदींनी जय्यत तयारी केली होती. यावेळी महिलांचीही गर्दी होती. मात्र, पंकजा मुंडे यांचा ताफा येथे न येता कोल्हापूरकडे रवाना झाल्याने उपस्थितांमध्ये नाराजी पसरली.
मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना मोठं गिफ्ट! पगारवाढीची घोषणा, आकडा वाचून व्हाल थक्क
समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकार घडला. मात्र, मुंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांची दूरदृष्य संवाद साधून माफी मागिती.
दरम्यान, तत्पूर्वी मुंडे या राजारामबापू कारखान्यावर गेल्या होत्या. स्व. बापूंच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कारखान्याचे संचालक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्या म्हणाल्या की, त्यांचे आणि आमदार पाटील यांच्या पत्नी शैलजा पाटील यांचे घरगुती संबंध आहेत, त्यामुळे या भेटीला राजकीय संदर्भ देण्याचे कारण नाही.
गुरुवारी सकाळी त्यांनी सांगलीतील श्री गणेशाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार सुधीर गाडगीळ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर त्या पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्या सोलापूरकडे रवाना झाल्या.
पंकजा मुंडे यांनी आपल्या यात्रेकडे राजकीयदृष्टीनं न पाहण्याचं आवाहन केलं. मात्र, राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने पंकजा यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे येत्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना या परिक्रमेचा लाभ मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.