मिरवणुकीत धक्का लागल्यावरून राडा

अहमदनगरः महात्मा फुले जयंती मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणातून सहा जणांनी एकाला दांडके व रॉडने मारहाण केली आहे. भिंगार येथे ही घटना घडली आहे. भिंगार पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविष्कार संजय पुंड हा गंभीर जखमी झाला आहे. पुंड याच्या फिर्यादीवरून निलेश पेंडुलकर, सोनू पेंडुलकर, अक्षय हंपे, अभी शेलार, रोहित शिर्के, आन्या […]

अवैध धंद्यांची तक्रार केली म्हणून राजकीय गुंडांकडून वकिलाला बेदम मारहाण

Ahmednagar Crime

अहमदनगरः महात्मा फुले जयंती मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणातून सहा जणांनी एकाला दांडके व रॉडने मारहाण केली आहे. भिंगार येथे ही घटना घडली आहे. भिंगार पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविष्कार संजय पुंड हा गंभीर जखमी झाला आहे.

पुंड याच्या फिर्यादीवरून निलेश पेंडुलकर, सोनू पेंडुलकर, अक्षय हंपे, अभी शेलार, रोहित शिर्के, आन्या ऊर्फ आनंद नायकू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण भिंगारमधील आहेत.

महात्मा फुले जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भिंगार, नागरदेवळे परिसरातील मंडळे सहभागी झाली होती. मिरवणुकीत नाचत असताना एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. अविष्कार पुंड व त्यांच्या सहकार्‍यांना लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. जखमीला सिव्हील हॉस्पिटल येथे उपचार घेतल्यानंतर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version