Download App

शरद पवारांची सभा मणिपूरध्ये ठेवली तर…; फडणवीसांनी विरोधकांना डिवचलं

Devendra Fadnavis Said The opposition should decide who will be their national leader : राज्यात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुकांसाठी सर्वाच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी आपल्या बैठका, मेळावे घेण्यास सुरूवात केली. आगामी निवडणुकीत राज्य आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपची घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र येतांना दिसताहेत. नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. विरोधकांची होत असलेली एकजूट पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर शेलक्या शब्दात टीका केली. चाळीस चोर कितीही एकत्र आले तरी ते मोदींना हरवू शकत नाही, कारण, त्यांना राष्ट्रीय नेताच नाही, असं फडणवीस म्हणाले.

फडणवीस हे सध्या अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. आज भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला महासत्ता बनवण्यासाठी, बलशाली राष्ट्र बनवण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. मात्र, त्यांना हटवण्यासाठी देशातील अलीबाबा आणि चाळीस चोर एकत्र येत आहेत, असा घणाघात फडणवीसांनी केला.

फडणवीस म्हणाले, हे चाळीस चोर कितीही एकत्र आले तरी ते मोदीजींना हटवू शकत नाहीत. त्यांनी 2019 च्या निवडणुकांमध्येही त्यांनी मोदींना हटवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा कोणताही राष्ट्रीय नेता नसल्याने त्यांच्या प्रयत्नांचा काही उपयोग झाला नाही. ममता बॅनर्जीची सभा अहमदनगरमध्ये झाली तर त्यांना पाहायला-ऐकायला कोण जाईल, शरद पवारांची सभा मणिपूरध्ये ठेवली तर कोण पाहायला जाईल.

संसद भवन, केजरीवाल दौरा अन् चहाचा हिशोब; शिंदेंनी एक एक करत विरोधकांना धुतलं</a
>

अखिलेश यादवची सभा चेन्नईमध्ये ठेवली तर कोण ऐकायला जाईल, पण, मोदी कुठंही गेले तरी लाखो लोक त्यांच्या स्वागताला उभे असतात, असं म्हणत विरोधकांची खिल्ली उडवली. विरोधकांनी त्यांचा राष्ट्रीय पातळीवर नेमका नेता तरी कोण हे ठरवलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

यावेळी बोलतांना फडणवीसांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. ते म्हणाले, कोण कोणत्या खुर्चीवर बसणार इथून यांचे भांडणं होतात. राज्यातील हे नेते कधीच एकत्र येऊ शकत नाहीत, त्यांना एकत्र आणण्याचं काम फक्त एकच गोष्ट करू शकते, ती म्हणजे सत्ता. सत्तेत राहून पैसा जमा करायचा, एवढंच महाविकास आघाडीत नेत्यांना माहित आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.

Tags

follow us