Download App

आधीच सरकार हे महाविकास आघाडी नाहीतर महाविनाश आघाडी; फडणवीसांनी घेतला समाचार

Devendra Fadnavis criticized Mahavikas Aghadi : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यात कायम आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी भाजप आणि मविआतील नेते सोडत नाही. आताही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीचा जोरदार समाचार घेतला. महाविकास आघाडीचं सरकार असतांना राज्यात विकासाची कामं झाली नाही. आधीच सरकार हे महाविकास आघाडी नाहीतर महाविनाश आघाडी होतं, अशा शब्दात फडणवीसांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं.

फडणवीस हे सध्या अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. आज भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, गेल्या १० महिन्यांपूर्वी राज्यात आपलं सरकार अस्तित्वात आलं. त्यांनंतर अनेक विकास कामांची पायभरणी आपण केली. मात्र, महाविकास आघाडीच्या काळात राज्याच्या विकासाला खीळ बसली होती. आधीच्या सरकारच्या काळात राज्यात विकासांची कुठलीही कामे झाले नाहीत. आधीच सरकार महाविकास आघाडीचं सरकार नाही, तर महाविकाश आघाडीचं, महावुसलीचं सरकार होतं, अशा शब्दात फडणवीसांना महाविकास आघाडीवर टीका केली.

‘त्या’ दोन मोदींना भारतात आणा, तुमचे आम्हीही स्वागत करू; काँग्रेस नेत्याचा पंतप्रधानांना खोचक टोला

महाविकास आघाडी सरकारला सामान्य माणूस, शेतकरी वर्ग यांच्याशी काही देणंघेणं नव्हतं. या आघाडीच्या काळात झालेल्या अतिवृष्टीचे पैसेही आपलं सरकार देतं. त्यांच्या काळात झालेल्या अतिवृष्टीचे 292 कोटी आपण दिले, 190 कोटी वाटूनही झाले. उरलेल्या निधीचं लवकरच वाटप होईल. राज्यात आपलं सरकार आल्यानंतर अतिवृष्टी, गारपीठ, सततचा पाऊस झाला. त्याचा निधी आपण दिला. नगर जिल्ह्यात 500 कोटींचा निधी आपण दिला. राज्याच्या अर्थसंकल्पात आपण अनेक चांगल्या योजना आपण आणल्या. केंद्र सरकार किसान सन्मान निधीतून 6000 रुपये सरकारला देतं. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारही नमो किसान योजेनेच्या माध्यमातून आपण 6 हजार रुपये देतंय.

फडणवीस म्हणाले, देशाचं राजकारण आता दोन काळखंडात विभागल्या गेलं. पहिला काळखंड म्हणजे, २०१४ पूर्वीचं राजकारण, आणि २०१४ नंतरचा राजकारण आणि भारत. या 2014 नंतरच्या काळखंडात सर्वसामान्य नागरिकांना शौचालय, घरे, वीज या सगळ्या सुविधा मिळाल्या. मोदीजींमुळं एकट्या नगरमध्ये 70 हजार कुटुंबांना घरे मिळाल. 75 वर्षानंतर हे बेघर कुटूंबे मोदींमुळं स्वताच्या घरात राहायला गेले. हजारो घरी सिलेंडर, शौचालय आलं. युपीएच्या काळात इंफ्रास्ट्रक्चरवर दिड लाख कोटी खर्च व्हायचे. आताचं सरकार दहा लाख कोटी खर्च करते. जेव्हा मोठमोठी विकास कामे होतात, तेव्हा 32 कोअर इंडस्ट्री आणि हजारो हातांना कामं मिळतं.

ते म्हणाले, भाजप जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या ९ वर्षात नव भारताची निर्मिती केली.
मोदी हे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वमान्य नेते आहेत. आस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान आपल्या मोदींचे पाय धरतात. हा सन्मान केवळ मोदींचा सन्मान नाही, तर देशाचा सन्मान आहे, असं फडणवीस म्हणाले.

 

 

 

Tags

follow us