साईं दरबारीच भक्त आणि सुरक्षा रक्षक भिडले

अहमदनगर : देशासह जगभरात प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील शिर्डी येथे साईंच्या दर्शनासाठी लाखो भक्त येत असतात. साईंची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी भक्त येथे येते साईंच्या चरणी लिन होत असतात. मात्र याच शिर्डी मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिर्डीत दर्शनासाठी आलेल्या साई भक्त व सुरक्षा रक्षकामध्ये थेट हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा […]

Untitled Design

Untitled Design

अहमदनगर : देशासह जगभरात प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील शिर्डी येथे साईंच्या दर्शनासाठी लाखो भक्त येत असतात. साईंची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी भक्त येथे येते साईंच्या चरणी लिन होत असतात. मात्र याच शिर्डी मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिर्डीत दर्शनासाठी आलेल्या साई भक्त व सुरक्षा रक्षकामध्ये थेट हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शिर्डीतील साई संस्थानमध्ये रामनवमीचा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. या काळात देशभरातून मोठ्या प्रमाणावर पालख्या शिर्डीत येत असतात. त्यानुसार यंदाही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. आज या उत्सवाची सांगता असून या पालख्या परतीच्या प्रवासाला निघाल्या आहेत.

डाव उलटा पडला तर आम्ही सत्तेत येऊ, तेव्हा…राऊतांनी दिला इशारा

या दरम्यान मुंबईची साईलीला पारखी ही गेट क्रमांक पाचमधून बाहेर पडली होती. बाहेर आल्यानंतर या पालखीतील भाविकांचं काही वस्तू या आतमध्ये राहिल्या होत्या. दरम्यान राहिलेलं सामान एकजण पुन्हा घेण्यासाठी त्याच रांगेतून पुन्हा आतमध्ये गेले असता सुरक्षा रक्षक व साईभक्तामध्ये वाद झाला.

अजितदादांच्या डोक्यात नाशिक लोकसभेसाठी माणिकराव कोकाटे? गोडसे, भुजबळांना टेन्शन

यानंतर हा किरकोळ वाद विकोपाला गेला त्यानंतर त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकारानंतर मंदिर परिसरात काहीकाळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. शिर्डीत अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. सुरक्षारक्षकातून वादातून अशा हाणामाऱ्या यापूर्वीही झाल्या आहेत.

Exit mobile version