मनोरुग्णाचा कंडका पडला ! ‘राजाराम’ जिंकल्यानंतर महाडिक बरसले !

Dhananjay Mahadik Vs Satej Patil: कोल्हापूरमधील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीत महाडिक गट आणि सतेज पाटील यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष पेटला होता. त्यातून एकमेंकावर जोरदार आरोप झाले. पण मतदारांनी कौल हा महाडिक गटाच्या बाजूने दिला आहे. या निवडणुकीत सर्वच जागांवर महाडिक गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक हे आमदार सतेज पाटील यांच्यावर […]

Dhanajay Maahadik

Dhanajay Maahadik

Dhananjay Mahadik Vs Satej Patil: कोल्हापूरमधील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीत महाडिक गट आणि सतेज पाटील यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष पेटला होता. त्यातून एकमेंकावर जोरदार आरोप झाले. पण मतदारांनी कौल हा महाडिक गटाच्या बाजूने दिला आहे. या निवडणुकीत सर्वच जागांवर महाडिक गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक हे आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार बरसले आहेत. सतेज पाटील हे मनोरुग्ण असून, त्यांचा आम्हीच कंडका पाडला असल्याची तोफ महाडिक यांनी डागली आहे.

‘गुलाबी’ वादळाचे काटे कोणाला टोचणार? मराठवाड्यातच ‘एंट्री’ का?

धनंजय महाडिक म्हणाले, विरोधकांनी अपप्रचार केला. विखारी प्रचार केला. पण आमचा विचारी प्रचार होता. आम्ही सभासदांचा विचार केल्याने यशाचा कौल आम्हाला मिळाला आहे. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कंडका पाडणार असे स्लोगन वापरले. पण सभासदांनी त्यांचाच कंडका पाडला आहे.

खासदार महाडिक यांनी सतेज पाटील व त्यांचे बंधू संजय पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या दोघांनी भ्रष्टाचार, डोनेशनचा पैसे, अवैध व्यवसायातील पैसा हा निवडणुकीत वापरला आहे. मतदारांना प्रलोभन दाखविण्याचे काम केले. पण मतदारांनी त्यांना झटका देत आमचा पॅनल निवडून आणला असल्याचे महाडिक म्हणाले. विनय कौरे, खासदार धैर्यशील माने यांच्यासाठी अनेकदांनी आम्हाला मदत केल्याने आमचा विजय झाला आहे. हा विजय महादेवराव महाडिकांचा आहे.

भावी मुख्यमंत्री ! सासरवाडीत झळकले अजित पवारांचे बॅनर

सतेज पाटील हे मनोरुग्णवृत्तीचे आहे. त्यांनी पैशाची मस्ती दाखविली आहे. लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे वैयक्तिक चारित्र्यहनन केले. त्यांचा घाणेरडा विचार असल्याचा आरोपही धनंजय महाडिक यांनी केला आहे.

महाडिक परिवाराला काही वर्षांत अनेक पराभवाला सामोरे जावे लागले होते. राज्यसभेच्या निमित्ताने पुन्हा गुलाल आम्हाला लागला आहे. या निवडणुकीत महाडिकांना गुलाल लागलेला आहे. हा आमचा आणि भाजपचा गुलाल आहे. यापुढे हे असेच गुलाल आम्हाला लागतील, असा विश्वासही महाडिक यांनी व्यक्त केलाय.

Exit mobile version