Download App

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलाच पाहिजे, आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका…; उदयनाराजेंचं विधान

  • Written By: Last Updated:

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला २४ डिसेंबर पर्यंतची वेळ दिली आहे. आरक्षणावरून मराठा-ओबीसी यांच्यातला संघर्ष तीव्र होत आहे. अशातच आता खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य केलं. मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे.

इंग्लंडला विश्वचषकात मिळाला दुसरा विजय, पॉईट टेबलमध्ये बदल 

मराठा आरक्षणसााठी राज्यभर साखळी उपोषण सुरू असून सोलापूरमझील दोन तरुणांनी उदयनराजेंची साताऱ्यात भेट घेतली. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात स्वत:च्या रक्तानं लिहिलंलं पत्र उदयराजेंना सादर केलं. यावेळी उदयनराजे भोसले यांनी हे वक्तव्य केले.

मराठा आरक्षणासाठी स्वत:च्या रक्ताने लिहिलेलं पत्र दोन तरुणांनी उदयनराजेंना यांना दिलं. पंढरपूर येथील शहाजी दांडगे आणि ज्ञानेश्वर गुंड हे दोन मराठा तरुण पंढरपूर ते सातारा असा १८५ किलोमीटर पायी प्रवास करून आज साताऱ्यात दाखल झाले. पंढपरपूर, महुत, दिघंची, मायणी, औंध असा पाच दिवसा पायी प्रवास त्यांनी केला. दरम्यान, साताऱ्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी उदयनराजेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोन तरुणांचे कौतुक करत उदयनराजेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली.

‘लेडीकिलर’च्या अफवांवर दिग्दर्शक अजय बहलचे स्पष्टीकरण, हा एक संपूर्ण चित्रपट 

यावेळी बोलतांना उदयनराजे म्हणाले की, आरक्षाच्या मुद्यावरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरक्षण मिळत नसल्यानं मराठा समाजात मोठा उद्रेक आहे. आरक्षण द्यायला जितका वेळ लागेल, तितका हा उद्रेक वाढत जात आहे. आज या तरुणांनी रक्तानं पत्र लिहिल. जरांगे पाटील यांच्यावर उपोषण करायची वेळ आली.
आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करायचे असेल तर असं करा की, जनगणना होईपर्यंत निवडणुकाच घेऊ नका, प्रत्येकाला तुम्ही न्याय देत नाही, त्यांचं आरक्षण फिक्स करत नाही, तोपर्यंत इलेक्शन घेऊ नका. बेसिक म्हणजे, जनगणना करा ना, कशाला कचेऱ्या दाखवत आहात? असा सवाल त्यांनी केली.

मी सरकारला हात जोडून विनंती करतो की, तुमच्या कितीही राजकीय महत्त्वाकांक्षा असतील, पण कोणतीही किंमत मोजा, पण सर्वसामान्यांचा विचार करा. मराठा आरक्षणसाठी आजवर ज्या काही आत्महत्यचा झाल्या आहेत, त्या जर अशाच होत राहिल्या तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असा इशारा उदयनराजेंनी दिला.

आरक्षणाबाबत प्रत्येक वेळी सरकार सोयीप्रमाणे एक महिना, दोन महिना वेळ वाढवून घेत आहे, हे नेमंक काय चाललं हेच कळत नाही. मराठा आरक्षणावरून वाद सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी वाद केला नाही. इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल. मग तो कोणत्याही जातीतला असाल तरी त्याला मदत करणं शासनाचं काम आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलाच पाहिजे. यावर ठोस निर्णय न घेतल्यास पुढची पिढी तुम्हाला आणि आम्हाला कदापी माफ करणार नाही, असंही उदयराजे म्हणाले.

 

Tags

follow us