Download App

ED Raid : सांगलीतल्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या घरी ईडी! जिल्ह्यात एकच खळबळ…

राज्यात ईडीकडून अद्यापही धाडसत्र सुरुच असून सांगलीतल्या दोन उद्योजकांच्या घरावर आज ईडीची धाड पडलीय. ईडीकडून ही धाड सकाळी 7 सुमारास पडल्याने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय.

ओंकार भागानगरे खून प्रकरणातील मुख्य दोन आरोपींना पुण्यातून अटक

सांगलीतले बडे उद्योजक पारेख बंधूंच्या घरावर ईडीने धाड टाकलीय. ईडीने धाड टाकून पारेख बंधूंची चौकशी करण्यात आली आहे. त्याचबरोबर घराची झाडाझडतीही घेण्यात आली आहे. ईडीची ही पथकं सुरेश आणि दिनेश पारेख बंधू यांच्या शिवाजीनगर येथील दोन बंगल्यात गेली आहेत. तेथे ईडीचे अधिकारी काही जणांची चौकशी करत आहेत.

काही काळबेरं केलं नसेल तर घाबरताय कशाला, संजय शिरसाटांचा विरोधकांना सवाल

पारेख बंधूचा सांगली शहरात गणपीत पेठमध्ये लाईट विक्रीचा मोठा व्यवसाय आहे. याचं व्यावसायिकांवर मागील काही वर्षांपूर्वी कोट्यावधींच्या अर्थिक अनियमिततेतून सीमा शूल्कसह व्हॅटच्या पथकाने धाड टाकली होती. त्यासोबतच जीएसटी अधिकाऱ्यांनी कर वसुल केल्याचीही माहिती समोर आली आहे. आता पुन्हा ईडीच्या धाडीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन खासदार अमोल कोल्हेंचा हल्लाबोल, म्हणाले…

या धाडीची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पारेख बंधूंच्या घरी दाखल झाले होते. काही वेळानंतर स्थानिक पोलिस तेथून निघून गेल्याची माहिती मिळाली आहे.

पारेख हे सांगलीतील बडे व्यावसायिक आहेत. या पारेख बंधूंचा इलेक्ट्रिकलचा मोठा व्यवसाय आहे. आर्थिक आणि व्यवसायातील अनियमितता या संशयावरून ही कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, चौकशीचा अधिकृत तपशील देण्यास मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांचा नकार दिला आहे.

Tags

follow us