Download App

पुन्हा येरे माझ्या मागल्या! गोकुळच्या बैठकीपूर्वीच गोंधळ; सतेज पाटील विरूद्ध महाडीक संघर्ष पेटला

  • Written By: Last Updated:

Gokul : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजत असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) ची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडत आहे. मात्र दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील या बैठकी पूर्वीच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी सतेज पाटील विरूद्ध महाडीक असा पुन्हा संघर्ष तापल्याचं दिसून आलं.

Sonu Sood: सामन्याचा ‘मसिहा’ सोनू सूदचा क्लासी प्रो जिम लूक पाहिलात का?

त्यामुळे समर्थक आणि सदस्य यांनी बॅरिकेट्स तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला. त्यात या लोकांना आवरण्यास पोलिसांची कुमक कमी पडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ही गर्दी आवरण्यासाठी पोलिसांची मोठी दमछाक झाली. त्यामुळे गोकुळची यंदाची बैठक देखील वादळी ठरणार असल्याचं चित्र दिसत आहे.

CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेला जाणार? राऊत म्हणाले, जर पोलिसांनी…

सभेच्या स्थळी बाहेर अशी परिस्थिती असल्याने सभेमध्ये काय होणार? याचा अंदाज वर्तवला जात आहे. सभेच्या पूर्वी सभास्थळी येणाऱ्या सभासदांचे पासेस आणि ठरैाव तपासले जात होते. मात्र एकाचवेळी सर्व सभासद आले त्यांनी गर्दी केली आणि त्यांनी थेट बॅरिकेट्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या सत्ताधाऱ्यांना विरोधी गट महाडीकांनी काल पासूनच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले होते. त्यात आज सभेपूर्वीच महाडिक समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. तर राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळच्या सभेत महाडिक समर्थक घुसले. त्यांनी मोठा गोंधळ या सभास्थळी केला आहे.

Tags

follow us