Gokul President Election : कोल्हापूर जिल्हा दूध संघ म्हणजेच गोकुळचा (Gokul ) अध्यक्ष निवडण्यासाठी सभा बोलविण्यात आली होती. परंतु कोरमअभावी सभा तहकूब करण्यात आली. परंतु काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीची समांतर सभा झाली. या सभेत गोकुळच्या अध्यक्षपदी शशिकांत पाटील-चुयेकरांची (Shashikant Patil-Chuyekar) निवड करण्यात आली. कोरम नसला तरी चुयेकरांची निवड कायदेशीर असल्याचा दावा समविचारी आघाडीने केला आहे. पण सभा तहकूब करण्यात आल्याने ही निवडीवर आता कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.
मुंबईच्या समुद्रात तरंगते होर्डिंग;‘मुंबईकरांवर आणखी एक अन्याय’,आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र!
समविचारी आघाडीविरुद्ध महायुती अशी गोकुळची निवडणूक झाली. त्यात महायुतीचे बारा, तर समविचारी आघाडीचे 13 संचालक निवडून आले. समविचारी आघाडीला बहुमत मिळाले. परंतु गोकुळच्या नियमात 14 संचालक सभेत उपस्थित राहून पाठिंबा देणे आवश्यक आहे. 14 संचालकांची कोरम संख्या आहे. अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक अधिकारी तथा करवीचे प्रांतधिकारी मोसमी चौगुले यांच्या उपस्थित सभा बोलविण्यात आली होती. या सभेला समविचारी आघाडीचे 13 संचालक उपस्थित होते. परंतु महायुतीचा एकही संचालक सभेला आला नाही. समविचारी आघाडीच्या नवनिर्वाचित संचालकांनी आपल्याकडे बहुमत असल्याचे सांगत, अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केली होती. यासंदर्भात त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनही दिले. मात्र, कोरम पूर्ण नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला.
समविचारी आघाडीची समांतर सभा आणि अध्यक्ष निवड
समविचारी आघाडीच्या संचालकांनी समांतर सभा बोलविले. त्यात अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुयेकर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड वैध असल्याचा दावाही समविचारी आघाडीने केला आहे.
हसन मुश्रीफ सतेज पाटलांची साथ देणार ?
अध्यक्षपदाच्या निवडीबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी आम्ही शशिकांत चुयेकरांना अध्यक्षपदी बसवू शकतो, असे विधान केले आहेत. त्यात मुश्रीफ यांनी गोकुळच्या निवडीवर भाजपवर काही आरोप केले आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ गोकुळमध्ये सतेज पाटील यांना साथ देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अध्यक्षपदाबाबत महायुतीने अद्याप आपले पत्ते खोलले नाहीत. महायुतीचे सर्व संचालकही गोव्यात सहलीसाठी गेलेले आहेत. अध्यक्ष न निवडल्यास गोकुळ प्रशासकराज येण्याचा धोका आहे.
