Download App

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नीरा उजव्या कालव्याची सुटणार सलग दोन आवर्तनं

Good news For Farmers Neera right canal : नीरा प्रणालीतील भाटघर(Bhatghar), वीर (Veer), नीरा देवघर(Neera Deoghar), गुंजवणी धरणातील (Gunjwani Dam)पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असून त्यानुसार 10 मार्चपासून 12 मेपर्यंत पहिले उन्हाळी आवर्तन (summer rotation)सुरु आहे. आणि दुसरे सलग आवर्तन 13 मे ते 19 जूनपर्यंत देण्याचे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत (Canal Advisory Committee Meeting)ठरले आहे.

Rakhi Sawant: ड्रामा क्वीन ‘या’ कारणासाठी घेणार पंतप्रधानांची भेट; म्हणाली, “जर कंगनाला रनौतला…”

जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठका शासकीय विश्रामगृह येथे झाल्या. नीरा उजवा कालवा सल्लागार समिती बैठकीस आमदार दत्तात्रय भरणे, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, दीपक चव्हाण, समाधान आवताडे, भिमराव तापकीर, संजय जगताप, रवींद्र धंगेकर, अशोक पवार, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.

नीरा प्रकल्पात उपयुक्त साठ्याच्या 47.50 टक्के म्हणजेच 22.96 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. उन्हाळी हंगामात नीरा उजव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी 13.93 टीएमसी पाणी व बिगर सिंचनासाठी 14.78 टीएमसी पाणी वापराचे नियोजन आहे. त्यानुसार 19 जूनपर्यंत सलग दोन उन्हाळी आवर्तने देण्यात येणार आहेत. माळशीरस, सांगोला, पंढरपूरपर्यंत कालव्याच्या टेलपर्यंत पुरशा दाबाने पाणी जाण्यासाठी पाटबंधारे विभागाने यांत्रिकी विभागाच्या सहाय्याने योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. त्याचबरोबर नीरा डाव्या कालव्याला 1 मार्चपासून 30 एप्रिलपर्यंत पहिले उन्हाळी आवर्तन सुरू आहे. आणि पुढे लगेच 1 मेपासून 30 जूनपर्यंत दुसरे आवर्तन दिले जाणार आहे.

जलसंपदा विभागात कनिष्ट अभियंत्यांच्या 500 पदांची भरती लवकरच होणार असून त्यातून क्षेत्रीय स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाणार आहे. मनुष्यबळाची कमतरता दूर होण्यासाठी वर्ग 3 व 4 मधील कर्मचारी बाह्यस्रोताद्वारे उपलब्ध करुन घ्यावेत. पाणीवापर संस्थांची 50 टक्के परताव्याची रक्कम प्राधान्याने वितरीत करावी, कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी आदी सूचना यावेळी पाटील यांनी केल्या आहेत.

भामा आसखेड प्रकल्पातून पुणे महानगरपालिकेला पाणी पुरवण्यात येते. त्याशिवाय भामा व भीमा नदीत 15 ते 27 मेपर्यंत सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. पवना धरणात 3.23 टीएमसी पाणीसाठा असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन केले असल्यामुळे 15 जुलैपर्यंत पाणीवापर निश्चित करण्यात आला असला तरी तो पुढील कालावधीतही पुरणार आहे.

चासकमान प्रकल्पातंर्गत चासकमान आणि कलमोडी धरणात मिळून एकूण 3.75 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. योग्य नियोजनामुळे उन्हाळी तीन आवर्तने देण्यात येणार आहेत. 1 मार्च ते 29 एप्रिलपर्यंत पहिले आवर्तन सुरु आहे. दुसरे आवर्तन 5 मे ते 3 जूनपर्यंत आणि तिसरे आवर्तन 8 मे ते 17 जूनपर्यंत देण्याचे चासकमान कालवा सल्लागार समिती बैठकीत ठरले आहे.

Tags

follow us