Gulabrao Patil : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते आज शिवसेनेच्या कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी पाटील यांनी विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली.
मोठी बातमी! धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास कोर्टाचा नकार
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, बाळासाहेबांचे हिंदुत्व हे सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारं होतं मात्र काही लोकांनी त्यांच्याबद्दल अपप्रचार केला. त्याचबरोबर त्यांना नगरसेवकापासून मुख्यमंत्र्यापर्यंत कोणतीही पद उपभोक्त आले असते. मात्र त्यांनी कधीही कोणतं पद घेतले नाही. पण त्यांचा वारसा कोणी संपवलं हे सर्वांनाच माहिती. मी त्यावर बोलणार नाही. तसेच देशात राम मंदिर व्हावं. हेही बाळासाहेबांचे स्वप्न होतं. ते मोदींनी पूर्ण केलं आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचारधारा स्वीकारून उठाव केला.
विधान परिषदेला विसरले, राज्यसभेला डावलले… हर्षवर्धन पाटलांवर आता थेट केंद्रात नवी जबाबदारी
कारण ज्या काँग्रेसला शिव्या देण्यात आमचं आयुष्य गेलं. ज्यांनी आमची बरबादी केली. त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बाळासाहेबांच्या खऱ्या वारसदारांनी मात्र आय लव यू म्हणलं. आणि ज्या एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला जिवंत ठेवलं त्यांच्यावर 50 खोक्यांची टीका केली गेली. पण अजित पवार भाजपसोबत आल्यानंतर खोक्यांची टीका बंद झाली. अशोक चव्हाण आले तेव्हा खोके कुठे गेले.
Sunny Leone: सनी लिओनी ‘ग्लॅम फेम सीझन 1’ची होणार जज
काल जळगावमध्ये उद्धवसाहेबांचं पिल्लू आलं होतं. तेव्हा सभेला केवळ 500 लोक होते. कारण जेव्हा गर्दी जमायची ती आम्ही जमवत होतो. 1992 ची दंगलं झाली. त्यावेळी आम्ही तिघं भाऊ आणि आमचे वडील आम्ही जेलमध्ये होतो. तेव्हा संजय राऊत नावाचं कार्टून जन्माला देखील आलं नव्हतं. जे रोज आमच्यावरती टीका करतात. हा चोरटा आमचे 41 मतं घेतो आणि आमच्या वरती का करतो. त्यामुळे तू खरच तुझ्या आई-वडिलांची अवलाद असेल तर राजीनामा दे. असं आव्हान गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना दिलं आहे.