सातारा : मला गुलाब भाऊ नाही तर पाणीवाला बाबा व्हायचं आहे, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील (Water Supply Minister Gulabrab Patil)यांनी केलं होतं, त्यावर माझ्यावर विरोधकांनी बरीच टीका केली, असं मंत्री पाटील यांनी सांगितलं. पाणीपुरवठा खातं मिळाल्यानंतर लोकांनी हिणवलं, त्यावर मी सांगितलं की, अरे येतानाही पाणी लागतंय अन् जातानाही लागतंय, यासह विविध विषयांवरुन मंत्री पाटील यांनी टोलेबाजी केली. सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा स्तरीय कार्यशाळा आणि जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचा ई भूमिपूजन (E Bhoomipujan)सोहळा पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमामध्ये बोलत असताना गुलाबराव पाटील यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
त्यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील 38 हजार गावांना वर्क ऑर्डर देणारा हा गुलाबराव पाटील आहे. हे कोणाच्या भरोश्यावर? पाण्याचा कर्मचारी असेल, आमचे सीईओ(CEO) असेल, सगळेच जिल्हाधिकाऱ्यापासून आमदारापासून सगळेच. सातशे आठशे कोटी खर्च करणारं हे खातं होतं. त्यावेळी म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये या खात्याला महत्त्व नव्हतं.
ज्यावेळी आम्हाला हे खातं मिळालं त्यावेळी लोकं मला म्हणाले, काय घेतलं भाऊ पाणीपुरवठा हे खातं घेतलं? त्यावेळी मी म्हणालो, अरे येतानाही पाणी लागतंय अन् जातानाही पाणी लागतंय. त्यावेळी मी म्हणलं कोणताही पक्षावाला आला तरी आपलं पाणी पिणार, आणि पाण्याशिवाय दम नसतोय. म्हणून आम्ही पार्टी फार्टी काहिच केली नाही. जो पक्षवाला आला, कॉंग्रेसचा (Congress)येऊदे, राष्ट्रवादीचा (NCP)येऊदे, भाजपचा (BJP)येऊदे, शिवसेनेचा (Shivsena)येऊदे, मनसेचा येऊदे, अपक्ष येऊदे सगळ्यांना वर्कऑर्डर दिली.
त्यावर पुढे मंत्री पाटील म्हणाले की, गावातला पडलेला सरपंच म्हणतोय मीच आणलीय योजना, अरे बाबा लग्न आम्ही केलंय बारसं आम्हीच करणार, तुम्ही कोण सांगणारे असा टोलाही यावेळी मारला. विनाकारण याच्यामध्ये श्रेयवाद सुरु झालाय. मी सरपंचांना सांगेल की, वर्कऑर्डर मिळाली म्हणून खूश होऊ नका, मेन काम तर आता पुढं आहे. जर तुम्ही पाईपलाईनवर लक्ष ठेवलं नाही, पाणी आलं नाही तरं गुलाबराव पाटलाला नंतर शिवी पडेल आधी तुम्हाला शिवी पडेल असा उपरोधीक टोलाही यावेळी लगावलाय.