Heavy Rains In Kolhapur : पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मागील 48 तासात संपूर्ण कोल्हापुरात मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसामुळे पंचगंगा नदी ओसंडून वाहत आहे. आज पहाटे पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पुढील 48 तास कोल्हापूर जिल्ह्यासाठी महत्वाचे आहेत. (Heavy Rains In Kolhapur Panchganga River Crosses Warning Level Roads Closed Alert To Citizens)
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढतच आल्याने पंचगंगा नदीच्या पाणि पातळीत मोठी वाढ होताना दिसत आहे. नदीची पाणी पातळी आज पहाटे 40 फुटापर्यंत वाढली आहेत. ही पाणी पातळी धोक्याच्या पुढे गेली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. नदीमधील एकूण 85 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
नदीला पूर आल्याने कोल्हापूर मधील शिवाजी पूल – गंगावेश रस्ता पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोल्हापूर महापालिका प्रशासनामार्फत तारवाडा, उलपे मळा, कसबा बावडा येथील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सरसावले! पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश…
विदर्भात पावसाचा जोर कायम
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. ज्या-ज्या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे त्या जिल्ह्यांमध्ये सुट्टीचा आदेश देण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.