Download App

15 दिवसांत ‘ते’ लोकं साहेबांकडे फिरणार, आमदार रोहित पवारांचं मोठं विधान…

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी मोठं विधान केलंय. पुढील 10 ते 15 दिवसांत राजकीय परिस्थिती बदलणार असून अजित पवारांसोबत गेलेले लोकं मागे फिरणार असल्याचं भाकीत रोहित पवारांनी केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचा मोठा गट भाजप-शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी झाल्याने राजकारणाचे चित्रच बदलून गेले आहे. त्यावरुन राज्यात मोठा भूकंपच झाला आहे. अशातच रोहित पवारांच्या विधानाने राजकारणात चर्चांना ऊत आला आहे.

रोहित पवार म्हणाले, सध्या राजकारण गलिच्छ झालं आहे. भाजपची विचारसरणी सत्तेत येण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावून महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती खराब करीत आहे. त्यामुळे भाजपविरोधात लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. शरद पवार यांच्याविरोधात अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी सूर उमटवला आहे. आता तेच काही लोकं आमच्या संपर्कात असून काहीतरी चुकतंय असा विचार करुन ते पुन्हा माघारी फिरणार असल्याचं रोहित पवारांना स्पष्ट केलं आहे.

तसेच जे नेते अजितदादांच्या गटात गेलेत ते म्हणतात की, काहीतरी चुकतंय त्यामुळे शेवटी हे लोकं राजकीय आहेत. लोकांमध्ये काय चर्चा? याचा अंदाज पदाधिकाऱ्यांनाही आहे. त्यामुळे बांधणी करताना जे आपल्यासोबत आहेत त्यांना न्याय देण्याची शरद पवारांची भूमिका असून जे संपर्कात आहेत त्यांची दादांच्या गटात जाण्याची कारणे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Yugendra Pawar : पवारांनी फोडलं अजितदादांच घर?; युगेंद्र पवार पहिल्यांदाच राजकीय फ्रेममध्ये

दरम्यान, राज्यातील राजकीय परिस्थिती पुढील 10 ते 15 दिवसांत बदलणार असून अजित पवार गटात गेलेले 95 टक्के लोकं पुन्हा आमच्याकडे येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवसेनेसारखीच परिस्थिती झाल्याचं दिसून येत आहे. त्यावरुनच शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये रणकंदन सुरु असल्याचं दिसून येत आहे.

त्यांना अजित दादांना ताकद दाखवायचीय पण दुर्दैवाने… ; खडसेंचा अनिल पाटलांना टोला

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही गटाकडून आपल्या पक्षाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केल्याचं दिसून आलं, एवढंच नाहीतर अजित पवार गटाकडून जयंत पाटील आणि जितेंद३ आव्हाडांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी अजित पवार गटाने केलीय. तर दुसरीकडे जयंत पाटलांनीही अजित पवारांसोबत शपथविधी घेतलेल्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केलीय.

राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच आता राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते मानले जाणारे आमदार रोहित पवार यांनी मोठं भाकीत केलंय. सध्या तरी अनेक नेते अजित पवारांचाच हात धरत असल्याची परिस्थिती आहे, मात्र, पुढील काळात कोणते नेते शरद पवारांच्या पाठिशी ठामपणे उभे राहतील? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us