Ahmednagar Crime : अहमदनगरमध्येही कोयता गँगचा थरार, एक जण जखमी

अहमदनगर : पुण्यापाठोपाठ आता अहमदनगर जिल्ह्यातही कोयता गॅंगचा थरार पाहायला मिळाला आहे. पारनेर तालुक्यातील सुप्यात एका पानाच्या दुकानाची तोडफोड करीत कोयता गॅंगच्या सदस्यांकडून एका जणाला गंभीर जखमी केल्याची घटना घडलीय. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. नेमकं प्रकरण काय? पारनेर तालुक्यातील सुपा येथे काल दि. 5 रोजी एका पान दुकानाची तोडफोड करत कोयता गँगने एकाला […]

Untitled Design (98)

Untitled Design (98)

अहमदनगर : पुण्यापाठोपाठ आता अहमदनगर जिल्ह्यातही कोयता गॅंगचा थरार पाहायला मिळाला आहे. पारनेर तालुक्यातील सुप्यात एका पानाच्या दुकानाची तोडफोड करीत कोयता गॅंगच्या सदस्यांकडून एका जणाला गंभीर जखमी केल्याची घटना घडलीय. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.

नेमकं प्रकरण काय?
पारनेर तालुक्यातील सुपा येथे काल दि. 5 रोजी एका पान दुकानाची तोडफोड करत कोयता गँगने एकाला जखमी केले. हा थरार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुपा येथील पान दुकानावर पुणे येथील कैफ मन्यार व त्याच्या सहकार्यानी कोयते उडवत पान दुकानाची मोडतोड केली.

तसेच एकाला कोयता मारुन जखमी केले. याबाबत सुपा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. समीर जब्बार सय्यद (रा. सुपा) यांनी सुपा पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती कळताच सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी जखमी साजित शेख यास स्थानिकाच्या मदतीने जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. सुपा पोलिसांनी तात्काळ आपला मोर्चा पुण्याच्या दिशेने वळवला व या घटनेतील मुख्य आरोपी कैफ मन्यार यास रांजणगाव गणपती येथे अटक केली.

दरम्यान, आता अहमदनगरमध्येही कोयता गॅंग सक्रिय झाली असून या घटनेने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पोलिसांसमोर या कोयता गॅंगचा बंदोबस्त करण्याच मोठं आव्हान उभं राहिलंय.

Exit mobile version