Download App

मुख्यमंत्रिपदाबाबत जयंत पाटील स्पष्टच बोलले; जोपर्यंत आमचा नंबर येत नाही….

  • Written By: Last Updated:


Jayant Patil On Udhay Samant :
राष्ट्रवादी काँग्रेसबाबत वेगवेगळ्या चर्चा काही दिवसांपासून रंगत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार हे भावी मुख्यमंत्री असतील, असे बोर्ड लागले जातात. त्यात राष्ट्रवादीचे काही आमदार हे अजित पवार, जयंत पाटील हे भावी मुख्यमंत्री असतील असे बोलत आहेत. त्यात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसचे काही आमदार शिंदे गटातील येणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय. त्याला आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्रिपदाबाबत जयंत पाटील म्हणाले, पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी आमचा नंबर येत नाहीत. तोपर्यंत त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार किंवा इतर कोणाशीही माझी स्पर्धा नाही. अजित पवार यांच्या नेतृत्वात विधिमंडळात आमचे आमदार कार्यरत आहेत. भविष्यात आमचा पक्ष कसा वाढेल, याकडे लक्ष केंद्रित करत आहे. विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी अजित पवार व्यवस्थित सांभाळत आहेत. मला पक्षाची जबाबदारी दिली असून ती मी सांभाळत आहे. पक्षाची ताकद वाढल्याशिवाय व पक्ष मोठा झाल्याशिवाय पुढची स्वप्ने कोणी बघू नयेत, असे जयंत पाटील म्हणाले.

वेल्हे तालुक्याचं नामांतरण राजगड करा; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडं मागणी

मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे वीस आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. हा दावाही जयंत पाटील यांनी खोडून काढत मिश्किल टोलाही लगावला आहे. एकमेकांच्या संपर्कात सगळेच असतात. एकनाथ शिंदेही माझ्या संपर्कात आहेत. त्यामुळेच उदय सामंत म्हणतात ते खोटे नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीत भाकरी फिरली ! रोहित पवारांची महत्वाच्या पदावर शिफारस

मुख्यमंत्रिपदाच्या पोस्टरवर जयंत पाटील म्हणाले, पोस्टरबाजी आणि मागणी या कार्यकर्त्यांच्या भावना असतात. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सध्या आवश्यक बहुमत आहे. ते अजित पवार आणि आम्हाला माहीत आहे. कोणताही वाद नाही. राज्यभरात विविध प्रकारची पोस्टर झळकली तरी उत्साही कार्यकर्त्यांच्या त्या अपेक्षा असतात.

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मिरजमधील डिग्रस येथील कार्यक्रमात जयंत पाटील यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याने मुख्यमंत्री व्हावे, जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावर राष्ट्रवादीमधून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे, असे बोलून दाखविले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये एकमत नसल्याची राजकीय चर्चा सुरू आहेत. त्यात जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना हे स्पष्टीकरण दिले आहे.

Tags

follow us