Download App

रोहित पवारांना मोठा धक्का; कर्जत बाजार समिती राम शिंदेंच्या ताब्यात

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar Vs Ram Shinde : कर्जत बाजार समितीच्या सभापती-उपसभापती निवडीमध्ये आमदार रोहित पवारांना आमदार राम शिंदेंनी मोठा धक्का दिला आहे. ही बाजार समिती राम शिंदेंच्या ताब्यात आली आहे. कर्जत बाजार समितीच्या सभापतिपदी शिंदे गटाचे काकासाहेब तापकीर, तर उपसभापतिपदी अभय पाटील यांची निवड झाली आहे. (karjat-market-committee-ram-shinde-defect-rohit-pawar)

या बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे व पवार गटाचे प्रत्येकी नऊ संचालक निवडून आले होते. दोन्ही गटाचे समसमान संचालक असल्याने सभापती व उपसभापती निवडीकडे लक्ष लागले होते. आज झालेल्या मतदानात रोहित पवार गटाच्या सभापतीपदाच्या उमेदवाराला आठ मते मिळाली. तर रोहित पवार गचाच्या एका संचालकांचे मत बाद झाले. तर उपसभापतीपदामध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराला एक जास्त म्हणजे दहा मते मिळाली आहेत. रोहित पवारांचा एक संचालक फुटला आहे. त्यामुळे ही बाजार समिती आमदार राम शिंदेंच्या ताब्यात आली आहे.

Ajit Pawar : फडणवीस म्हणतात धूळफेक, अजितदादा म्हणाले, त्यांचं काम फक्त…

जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीतही दोन्ही गटाला समसमान मते मिळाली होती. येथे ईश्वर चिठ्ठीवर राम शिंदे गटाचा उमेदवार सभापती झाला. तर रोहित पवारांचा गटाचा उपसभापती झाला आहे. त्यामुळे दोन्ही बाजार समित्या राम शिंदेंच्या ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे राम शिंदेंची ताकद वाढली आहे.

आळंदीतील माऊली मंदिर परिसरात तणाव.. पोलीस-वारकऱ्यांमध्ये झटापट…

कर्जत बाजार समितीवर कब्जा मिळवण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्यात चुरस निर्माम होती. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाची निवडणूक रविवारी पार पडली. सहलीवर गेलेले सर्व संचालक कर्जतमध्ये दाखल झाले. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. कर्जत तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनकडून सभापतिपदासाठी काकासाहेब तापकीर व उपसभापतिपदासाठी अभय (आबा) पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा आमदार प्रा राम शिंदे यांनी केली होती.

तर राष्ट्रवादीकडून सभापतिपदासाठी गुलाबराव तनपुरे व उपसभापतिपदासाठी अक्षय शेवाळे यांनी अर्ज दाखल केला. मतदान झाल्यानंतर काकासाहेब तापकीर यांना नऊ मते मिळाले. तर पवार गटाच्या एका संचालकाचे मत बाद झाले. त्यामुळे तनपुरे यांना आठ मते मिळाली. तर उपसभापतिपदासाठी अभय पाटील यांना दहा मते मिळाली. तर अक्षय शेवाळे यांना आठ मते मिळाली. त्यातही पवार गटाचा एक संचालक फुटल्याचे समोर आले आहे.

Tags

follow us