Download App

तोंडात बोळा अन् हातपाय वायरीने बांधून दिला शॉक; अल्पवयीन मुलाकडून मित्राची हत्या, मदरशातील घटना

कोल्हापुरातील मदरशामध्ये अल्पवयीन मुलाने सहकारी मित्राच्या तोंडात बोळा कोंबून, हातपाय वायरीने बांधून शॉक देऊन हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Kolhapur News : कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय. हातकणंगले तालुक्यातील मदरशामध्ये (Kolhapur Madarsa) एका अल्पवयीन मुलाने त्याच्यासोबत राहणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रिक शॉक देऊन हत्या केल्याचं उघड झालंय. मदरसा बंद पडावा आणि सुट्टी मिळावी, यासाठी आरोपी मुलाने सहकारी मुलाची हत्या केली आहे.

फरहानच्या ‘लक्ष्य’ने गाठलं 21 वं वर्ष : एका तरुणाच्या आत्मशोधाची सैनिक बनण्याची प्रेरणादायी कहाणी

कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावाच्या माळरानावर धार्मिक शिक्षण देणारे मदरशा आहे. या मदरशामध्ये जवळपास 90 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी 70 विद्यार्थी बिहार राज्यातील आहेत. तर इतर राज्यातील विविध भागांतून आलेली आहेत. फैजन नाजीम नावाचा अकरा वर्षीय विद्यार्थी देखील शिक्षण घेत होता. त्याच्यासोबतच राहणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थ्याने इलेक्ट्रिक शॉक देऊन फैजानची हत्या केलीयं.

रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्याने फैजानच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा घातला. हाताला आणि पायाला इलेक्ट्रिक वायर बांधली. त्यानंतर स्विच ऑन करुन आरोपी मुलगा झोपी गेला. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास नमाजासाठी मुलांना उठवण्यात आलं. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

सुधाकर बडगुजरांचा भाजपात प्रवेश; सुषमा अंधारेंनी फाईलींचा हिशोबच काढला…

दरम्यान, धार्मिक शिक्षण संस्थेतील प्रत्येक रुममध्ये 25 विद्यार्थी राहतात. 15 जून रोजी रात्री अकरा वाजता फैजानची हत्या केली. तर 16 जूनच्या पहाटे फैजान मृत अवस्थेत आढळून आला. याबाबत संशय आल्याने संबंधितांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तपासाअंती अल्पवयीन मुलाने मदरसा बंद पडावा, आणि सुट्टी मिळून घरी जाता यावं, यासाठी हे सगळं केल्याचं समोर आलं.

दरम्यान, या अल्पवयीन मुलाने गुन्हा कबुल केला असून अजूनही विद्यार्थ्यांची चौकशी सुरु आहे. ही हत्या कट रचून करण्यात आली का? शॉक देण्यासाठी मुलाने वायर कुठून आणली, याचा तपास पोलिस करीत आहेत.

follow us