Kolhapur News : जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर अजूनही वाढतच चालला असून कोल्हापुरात संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशानसाकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. अशातच एक दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. खासबाग मैदानात एक भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू तर दुसऱी महिला गंभीर जखमी झाल्याचं समोर आलं आहे.
गरोदर महिलेचा थरारक प्रवास; आधी झोळी मग लाकडी ओंडक्यातून नदी पार#palgharnews #pregnantwomen #travelfloodwater #letsuppmarathi
गरोदर महिलेला पूलाअभावी ओंडक्याच्या सहाय्याने नदीच्या पात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागला आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील शेंडेपाडा इथली आहे. pic.twitter.com/fLEJi2goCV
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 25, 2023
दुपारच्या सुमारास या दोन महिला खासबाग मैदानातल्या भिंत कोसळल्याच्या दुर्घटनेत अडकल्या होत्या. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या महिलांना बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु होते. त्यानंतर अखेर एका महिलेचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
41 हजार कोटींचं नियोजन कसं? अजित पवारांनी विधानसभेत सांगितलं
कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयोजित कार्यक्रमासाठी अनेक लोकांनी हजेरी लावली होती. हा कार्यक्रम सुरु असतानाच खासबाग मैदानातली संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत सुरुवातीला दोन महिला अडकल्याची माहिती आली होती.
ही तर सावत्रभावाची वागणूक; एमआयडीसीबाबतची बैठक रद्द होताच रोहित पवारांनी डागली तोफ
दोन महिला अडकल्याची माहिती समोर येताच घटनास्थळी महानगरपालिकेचे अधिकारी आणि बचाव पथक दाखल झालं होतं. अथक परिश्रमानंतर महिलांना बाहेर काढलं. परंतु त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुसरी महिला जखमी झालेली असून उपचार सुरु आहेत.
दरम्यान, कोल्हापुरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच भागांत पाणीच पाणी झाल्याचं दिसून येत आहे. पंचगंगा नदीने पातळी ओलांडल्याने शहराच्या दिशने पाणी जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंचगंगा नदीसह जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांना पूर आला आहे. 82 हुन अधिक बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक मार्गावर पाणी आले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.