Kolhapur News : कोल्हापुरात आधीच तणावाची परिस्थिती असताना एका तरुणाने आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली असून या प्रकरणावरुन पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कागलमधील सर्वच चौकांत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमाराची घटना अत्यंत क्लेषदायक, अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
एका तरुणाने सोशल मीडियावर टिपू सुलतानच्या समर्थनात स्टेटस लावला होता. हा स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल होताच यावर हिंदुत्ववादी संघटनांना आक्षेप घेतला. तरुणांनी थेट पोलिस ठाणे गाठत कारवाई करण्याची मागणी केली. त्याआधीच पोलिसांनी या तरुणावर गुन्हा नोंद असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली.
पाटील, सावंत, सत्तार, भुमरे अन् राठोडांना डच्चू? भाजपाच्या अहवालाने खळबळ!
या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गोसावी यांनी तणावाची परिस्थिती निर्माण होताच दोन्ही समाजातील लोकांसह व्यापाऱ्यांशी समन्वय साधून बैठक घेतली. बैठकीत बंद न ठेवण्याचं आवाहन केलं. पोलिस अधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बंद न करण्याची ग्वाही नागरिकांनी दिली.
त्यानंतर आता कागल शहरात तणाव निवळला असून दैनंदिन व्यवहार सुरु झाले आहेत. दरम्यान, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून जबाब नोंदवून घेतला आहे. तणावाची परिस्थिती निर्माण होताच कागलमधील चौकाचौकात पोलिसांनी रॅपिक अॅक्शन फोर्सला बोलावून तैनात करण्यात आलं होतं.