कुकडीच्या पाण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे. दरम्यान, कुकडीच्या पाण्यावरुन आता चांगलच राजकारण तापत असल्याचं दिसून येत आहे. त्यावरुनच विखेंनी राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना घेरलं आहे.
समृद्धीच्या दुसऱ्या टप्प्या खुला; राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितले अहमदनगरचे भविष्य
खासदार सुजय विखे म्हणाले, कुकडीच्या पाण्यासाठी राष्ट्रवादीचे जे लोकं आंदोलनात सहभागी आहेत तेच लोकं श्रींगोद्याच्या कार्यालयात बसून काय करत आहेत? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी टोला लगावला आहे. अशा लोकांनी पक्षाचा राजीनामा द्यायला हवा, एकीकडे पक्षाचे पद घ्यायचं दुसरीकडे लोकांची सहानुभूती मिळवायची ,अशी दुटप्पी भूमिका कशासाठी घेतायं? असा ही सवाल त्यांनी केलायं.
अहवाल आले, काँग्रेसचे टेन्शन वाढले! दोन नेत्यांतील वाद टाळण्यासाठी उद्या बैठक
तसेच जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस येणार असून कुकडीच्या पाण्यासंबंधी त्यांच्याशी बोलणं झालं असल्याचं खासदार सुजय विखेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार राम शिंदे, यांच्यासह भाजपचे सर्वच नेते शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं विखेंनी सांगितलंय.
‘दादा’ हात जोडतो पाणी सोडा, कुकडीच्या पाण्यासाठी राम शिंदेंचे चंद्रकांत पाटलांना साकडे
अहमदगरला कधीच पाणी मिळालेलं नाही. मी याआधीही अनेकदा हे सांगितलं होतं. पण आता जेव्हा त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांना झळ बसली तेव्हा ते आता उठून बोलायला लागले असल्याचं विखेंनी म्हटलंय.
दरम्यान, मी मागील एक वर्षांपासून सांगतोय अहमदनगर जिल्ह्याला पाणी मिळविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरोधात लढा उभा करावा लागेल. त्यावेळी कोणीही आले नाही. झळ बसल्यावर ते जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणालेत.