Download App

माझ्या गोपीचंदला विधानसभेत पाठवा त्याला उद्योगाचं पत्र देऊनच परत पाठवतो : फडणवीस

माझ्या गोपीचंदला तुम्ही फक्त विधानसभेत पाठवा त्याला उद्योगाचं पत्र देऊनच परत पाठवतो अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.

Devendra Fadnavis Speech : जत विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे. आज पडळकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गोपीचंद पडळकर यांना विधानसभेत  पाठवण्याचे आवाहन उपस्थितांना केलं. माझ्या गोपीचंदला तुम्ही फक्त विधानसभेत पाठवा त्याला उद्योगाचं पत्र देऊनच परत पाठवतो. गोपीचंदने एमआयडीसी मंजूर करून घेतली आता येथे उद्योग देण्याची जबाबदारी या देवाभाऊची आहे, अशी ग्वाही देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

फडणवीस पुढे म्हणाले, राज्यातील २८८ मतदारसंघात जत हा सर्वात शेवटचा मतदारसंघ असला तरी माझ्यासाठी हा पहिला मतदारसंघ आहे. जत तालुका जाणीवपूर्वक दुष्काळी ठेवण्यात आला. पण आता येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही. दुष्काळावर मात करण्याची आमच्यात ताकद आहे. राज्य सरकारने विविध समाजघटकांसाठी महामंडळे सुरू केली आहेत. याची यादी खूप मोठी आहे. वंचित घटकांना न्याय देऊन राज्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

काँग्रेस नेत्यांना पोटदुखी

आज राज्यात मोठी गुंतवणूक येत आहे. यातून रोजगार निर्मिती होणार आहे. राज्य सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केल्यानंतर काँग्रेसच्या पोटात दुखायला लागलं. नाना पटोले, सुनील केदार हे काँग्रेसचे नेते तर थेट कोर्टात गेले. योजना बंद करण्यास सांगितले. पण तुम्ही चिंता करू नका तुमचे भाऊ जोपर्यंत मुंबईतल्या मंत्रालयात बसले आहेत तोपर्यंत या योजनेला धक्का लागणार नाही. जर पुन्हा आशीर्वाद मिळाला तर २१०० देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्‍यांनी कालच जाहीर केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस म्हणाले, राहुल गांधी आज महाराष्ट्रात आले आहेत. राहुल गांधी सध्या जी मोट बांधताहेत ती अतिशय घातक आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भारत जोडो सुरू केलं होतं. त्यावेळी आम्हालाही वाटलं होतं की ते काहीतरी चांगलं करताहेत. परंतु, नंतर लक्षात आलं की या भारत जोडोमध्ये शंभरच्यावर अशा संघटना आहेत ज्या फक्त अराजक पसरवणाऱ्या आहेत. त्यांचं रेकॉर्ड पाहिला तर लक्षात येतं या संघटना समाजात द्वेष कसा निर्माण होईल, समाजात विश्वास कमी होईल असा प्रयत्न करणाऱ्या आहेत.

video : शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ तर सुप्रिया सुळे..भाजप आमदार पडळकरांची घणाघाती टीका

follow us