Kolhapur News : ‘मी राजकारण करताना नेहमीच क्लिअर असतो. विषय नंबर एक उभा राहायचं की नाही राहायचं? उभा राहायचं (कार्यकर्त्यांचं उत्तर) हे क्लिअर झालं. विषय दोन अपक्ष राहायचं की तुतारी घ्यायची? तुतारीच घ्यायची.. आता विषय नंबर तीन तुतारी घेतली तर आताच घ्यायची की नाही? आताच घ्यायची इतकं सोपं आहे अशा खास पद्धतीने कार्यकर्त्यांशी संवाद साधत भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवारांना साथ देण्याचं नक्की केलं. आगामा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर घाटगेंचा हा डाव भाजपला कोल्हापुरात डॅमेज करणारा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
कागल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घाटगेंनी आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली. त्यांच्या या घोषणेनंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत समरजीत घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असे सांगितले जात आहे. या मेळाव्यात समरजितसिंह घाटगे यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समरजित घाटगेंना भाजपने दाणे घालू नयेत.. हसन मुश्रीफांनी ठणकावले
घाटगे पुढे म्हणाले, सगळ्यांच्या सहमतीने 2016 मध्ये भाजपात प्रवेश केला. प्रामाणिकपणे काम केलं. तरीपण 2019 मध्ये तिकीट मिळालं नाही. तिकीट काय मला आमदार करण्यासाठी पाहिजे होतं का नाही तर कागल, गडहिंग्लजला आमदार करण्यासाठी तिकीट पाहिजे होतं. कागलच्या विकासासाठी तिकीट पाहिजे होतं. पण काही राजकारणामुळे आपण वंचित राहिलो. आता तुम्ही सगळे म्हणत आहात की निर्णय घ्या. मी त्यावेळी सुद्धा निर्णय घेतला असता. पण मला काही संजय मंडलिकांच्या उलट प्रचार करण्याची गरज नव्हती. तेव्हाही मी निर्णय घेतला असता पण का नाही घेतला आणि आताही निर्णय घेण्यास मला काही फरक पडत नाही. तुमच्या सहमतीने नक्कीच निर्णय घेऊ. पण तुम्ही दोन महिने विना सत्तेचे टिकणार आहात का.
माझ्याकडे लोक येतात म्हणतात राजे तुतारी घ्या. दुसऱ्या हाताने लगेच म्हणतात निधी पाहिजे. पण तुतारी हाती घेतल्याने कुठला निधी मिळणार रे बाबा. दोन महिने नाही पण पुढील पंचवीस वर्ष निधी मिळेल कारण पुढील पंचवीस वर्षांचा काळ आपलाच आहे. पण दोन महिने सोसणार आहात का असा प्रश्न समरजित घाटगे यांनी विचारताच कार्यकर्ते म्हणाले आम्ही दोन महिने सोसणार तुम्ही काळजी करू नका. यानंतर घाटगे हो म्हणताय पण घरी गेल्यानंतर म्हणणार आम्हाला भांडी मिळत नाहीत, कोण म्हणणार आम्हाला निधीच मिळत नाही.
कोल्हापूरमध्ये दोन राजघराणे येणार आमने-सामने? शाहू महाराजांविरोधात समरजीतसिंह घाटगेंची चर्चा