सोलापूरच्या वेताळ शेळकेने उभारली ‘महाराष्ट्र केसरी’च्या जेतेपदाची गुढी ! मुंबईच्या पृथ्वीराजला सहज नमविले

Maharashtra Kesari won title Vetal Shelke: वेताळ शेळके याने पाटील याचा पराभव करत 66 व्या महाराष्ट्र केसरीची गदा पटकाविली.

Mahrashtra Kesari 2025

Mahrashtra Kesari 2025

Maharashtra Kesari won title Vetal Shelke: महाराष्ट्र केसरीसाठी मुंबईचा पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) व सोलापूरचा वेताळ शेळके (Vetal Shelke) यांच्यात लढत झाली. त्यात वेताळ शेळके याने सात गुणांनी पृथ्वीराज पाटील याचा पराभव करत मानाची 66 व्या महाराष्ट्र केसरीची गदा पटकाविली.

अंतिम लढतीतील पहिल्याच हाफमध्ये वेताळ शेळकेने पाच गुण घेत आघाडी घेतली. तर पृथ्वीराज पाटील याला एकच गुण घेता आला. त्यानंतर वेताळ शेळकेने आणखी दोन गुण घेत सात गुणांची आघाडी घेतली.

कर्जत येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे स्पर्धेचे संयोजक होते. अंतिम कुस्तीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते, खासदार निलेश लंके, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेही उपस्थित होते. अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली होती. या स्पर्धेतील अंतिम कुस्तीच्या निकालावरून स्पर्धा गाजली होती. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी कर्जतला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतर्फे दुसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली होती.


शिवराज राक्षेला पृथ्वीराजने पराभूत केले

या स्पर्धेत पैलवानांनी सहभागी होऊ नये, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने दिला होता. त्या इशाराकडे दुर्लक्ष करत अनेक पहिलवान स्पर्धेत सहभागी झाले होते. नगरमधील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचाला लाथ मारल्यामुळे वादग्रस्त ठरलेला शिवराज राक्षेही ही सहभागी झाला होता. दरम्यान याही कुस्ती स्पर्धेमध्ये सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या शिवराज राक्षे यांच्याविरुद्ध पृथ्वीराज पाटील अशी सेमी फायनल झाली. मात्र या मध्ये राक्षेचा पराभव करत पृथ्वीराज पाटील यांनी फायनल मध्ये धडक मारली व फायनलमध्ये पृथ्वीराज पाटील यांच्या विरुद्ध सोलापूरचे वेतन शेळके यांच्यामध्ये सामना झाला व या सामन्यात शेळके यांनी पाटील यांना मात देत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला.

Exit mobile version