Download App

Sanjay Raut : कोल्हापुरातही आहेत साडेतीन चोर; राऊतांचा निशाणा कुणावर ?

Sanjay Raut : विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्यानंतर जो राजकीय गदारोळ उठला. राऊतांवर (Sanjay Raut) हक्कभंग आणण्याची मागणी केली गेली. विधानसभेचे कामकाजही तहकूब करण्यात आले. तरी देखील राऊत मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. आज कोल्हापुरात याची प्रचिती आली. येथे आयोजित जाहीर सभेत राऊत म्हणाले, की चोरांना चोर नाही म्हणायचे तर काय म्हणायचे. मी सुद्धा खासदार आहे. सभागृहाचा मलाही आदर आहे, असे राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा : Sanjay Raut जेलमध्ये जाणं पत्करतील पण, राऊतांच्या भावाने ठणकावले

ते पुढे म्हणाले, की आमदारांचे चोरमंडळ आणि पक्ष वेगळा आहे. ते 40 चोर म्हणजे शिवसेना नाही. चाळीस चोरांचा अलिबाबा म्हणजे शिवसेना (Shivsena) नाही. अलीबाबा चाळीस चोर त्यातले कोल्हापुरातही साडेतीन चोर आहेत. तीन आणि एक अर्धा आहे. म्हणजे इकडे साडेतीन चोर आहेत. या चोरांचे करायचे काय, तर आपण त्यांना इथे श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे आहोत. त्यांना आता कायमचे विसरायचे. त्यांच्या छाताडावर शिवसनेचा भगवा फडकवून उमेदवार निवडून आणायचे हीच बाळासाहेब ठाकरेंना खरी आदरांजली ठरेल, असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut : तुरुंगात गेलो, यांना काय घाबरायचं ?; हक्कभंगाच्या गदारोळावर राऊतांनी सुनावले

शिवसेनेच्या नावावर शिवसैनिकांच्या नावावर तुम्ही निवडून यायचे. उद्धव ठाकरेंनीही त्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचे आणि नंतर तुम्ही भाजपकडे जायचे अशा शब्दांत राऊत यांनी आमदारांचा समाचार घेतला.

दरम्यान, राऊतांच्या वक्तव्यावर आज विधीमंडळात चांगलाच ड्रामा पाहण्यास मिळाला.  सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू होते. राऊत यांच्या वक्तव्यानंतर चिडलेल्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली. आ. भरत गोगावले यांनी राऊतांवर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. त्यामुळे वाद अधिकच वाढला. त्यानंतर विरोधतकांनीही गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गदारोळातच अखेर विधानसभा अध्यक्षांनी कामकाज तहकूब केले.

 

Tags

follow us