Download App

Sharad Pawar : पक्ष म्हणजे आमदार नाहीत, राष्ट्रवादीत फूट नाही; शरद पवारांनी पुन्हा ठणकावलं!

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट नसल्याचे पुन्हा एकदा सांगितले. आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे, असे पवार यांनी ठणकावून सांगितले. आमच्यातून काही आमदार वेगळे झाले ही वस्तु्स्थिती आहे. पक्ष म्हणजे आमदार नव्हेत. देशपातळीवरील संघटनेत फूट नाही. काही आमदार पक्षातून बाहेर गेल्याने पक्षात फूट पडत नाही. मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असून जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत, असे पवार यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी अर्थात इंडियाची बैठक येत्या 1 तारखेला मुंबईत होणार आहे. 16 राजकीय पक्षांचे अध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत एकत्रित प्रचार मोहिम आणि लोकसभा निवडणुकीत एकत्रित राहण्याचा आढावा घेण्यात येणार असल्याचे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

‘पवार साहेब चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री’; सुळेंचे वळसे पाटलांना सणसणीत प्रत्युत्तर

कितीही तुरुंगात टाका, खटले भरा तरी आम्ही लढणारच

‘ईडी’, ‘सीबीआय’ यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला. आमच्याकडे नाही आला तर त्रास दिला जातो. ही भूमिका कर्नाटकात आणि अन्य राज्यात सत्ताधारी पक्षाची होती. महाराष्ट्रातही नवाब मलिक, अनिल देशमुख, सामनाच्या संपादकांवरही अशीच कारवाई करण्यात आली होती. याचा अर्थ सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम कसं करता येईल?, खटले कसे भरता येतील? हे पाहिलं गेलं. पण, त्यांनी कितीही तुरुंगात टाकलं कितीही खटले भरले तरी आम्ही एकजुटीने या फॅसिस्ट प्रवृत्तींचा प्रतिकार करणार आहोत आणि या कार्यक्रमाची दिशा 31 आणि 1 तारखेच्या बैठकीत ठरेल, असे पवार यांनी सांगितले.

इंडिया आघाडीच्या बैठकीत ठरणार निवडणुकीचा अजेंडा

सत्ताधाऱ्यांना निवडणुका नको आहेत. निवडणुका घेतल्या की सत्ताधाऱ्यांना जनमत काय आहे ते कळेल. लोकसभा निवडणूक एकत्र लढणे शक्य आहे का यावर इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होणार आहे भाजपाचा पराभव करण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होत आहे. या निवडणुकीला एकत्रितपणे कसे सामोरे जाता येईल याबाबत शक्यता पडताळून पाहिल्या जातील, असेही पवार (Sharad Pawar) म्हणाले.

अजितदादा आमचे नेते आहेत असं म्हणालोच नाही; पवारांचं काही तासातचं घुमजाव

Tags

follow us