Download App

‘राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येतील का?’ संजय राऊतांच्या तोंडीही नरमाईचे बोल..

Sanjay Raut : काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनपेक्षित घटना घडत आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे युती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, खुद्द राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. त्यानंतर आज खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी रडकुंडीला येऊन शरद पवारांना काय सांगितलं होतं?

राऊत आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चांवर प्रश्न विचारला. त्यावर राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं हा प्रश्न गेल्या 22 वर्षांपासून विचारला जात आहे. वारंवार विचारला जात आहे. पण, सध्याच्या परिस्थितीत ज्या प्रकारची हुकूमशाही या देशात चालू आहे. दडपशाही सुरू आहे. पैशाचं राजकारण केलं जात आहे ही जी महाराष्ट्राची ओळख काढायची असेल तर सर्व घटकांनी एकत्र यावं या मताची मी आहे.

अनेक दगडांवर पाय ठेऊन कुणालाही आता महाराष्ट्रात राजकारण करता येणार नाही. शिवसेनेने एक भूमिका घेतली. कधी झुकलो नाही वाकलो नाही. जे डरपोक होते स्वार्थी होते ते पळून गेले. पण जे राहिले ते कडवट निष्ठावंत त्यांच्या जोरावर शिवसेना पुन्हा एकदा आपला झेंडा महाराष्ट्रात आणि दिल्लीत रोवेल.

‘मी टायर्ड नाही, रिटायर्डही नाही’; दौरा सुरू होण्याआधीच पवारांनी अजितदादांना डिवचलं!

आम्ही शरद पवार, राहुल गांधींसोबत

या वयातही शरद पवारांचा संघर्ष सुरू आहे. राहुल गांधींचाही संघर्ष सुरू असून या प्रकारच्या सगळ्या संघर्षात आम्ही बरोबर आहोत. कारण देश आणि महाराष्ट्र वाचवायचा आहे. ज्यांची इच्छा आहे या महाराष्ट्रावरचा डाग निघावा, या राज्यातल्या मराठी माणसाला न्याय मिळावा यासाठी या सगळ्यांनी आपल्या मनातली किल्मिषं दूर करून एकत्र यायला काहीच हरकत नाही.

अशा लोकांना आम्ही..

काल विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशावर राऊत यांनी जहरी टीका केली. ते म्हणाले, काही महिन्यांसाठी आपले पद वाचविण्यासाठी गोऱ्हे पक्ष सोडून गेल्या. अशांना आम्ही श्रद्धांजली वाहतो. गोऱ्हे यांना 5 वेळी आमदार केले. त्यांना मिळालेले वैधानिक पद शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाले.

Tags

follow us