Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा (Maharashtra Elections) लवकरच होणार आहे. त्याआधी फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. तसेच नेतेमंडळींकडून सेफ पक्षाचा शोध घेतला जात आहे. तिकीट मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने दुसऱ्या पक्षांकडे चाचपणी सुरू झाली आहे. यात दिग्गज नेतेही मागे नाहीत. पुणे जिल्ह्यानंतर (Pune News) सोलापूर जिल्ह्यातही या संभाव्य पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीतील नेते महाविकास आघाडीत त्यातही शरद पवार गटात (Sharad Pawar) जाण्यात जास्त इच्छुक दिसत आहेत.
उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का! समर्थकांसह बडा नेता मुंबईला रवाना; हाती बांधणार शिवबंधन
आताही शरद पवारांनी मोठा डाव टाकत येथील दिग्गज नेत्याला गळाला लावलं आहे. अजित पवारांना माढ्यात मोठा धक्का बसला आहे. अजितदादांचे कट्टर समर्थक आमदार बबनराव शिंदे यांनी अखेर महायुती आणि अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह यांना अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय आमदार शिंदे यांनी घेतला आहे.
आमदार शिंदे पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना राज्यातील राजकीय परिस्थितीचा अंदाज आला आहे. त्यामुळे त्यांनी शरद पवारांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली होती. मात्र माढ्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या या मागणीला विरोध केला. आता हा विरोध पाहता त्यांनी मुलाला निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
बबन शिंदे यांनी शरद पवारांकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र आता त्यांनी आपल्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून शरद पवारांनाही इशारा दिला आहे. त्यांच्या या खेळीनंतर आता महायुतीचा उमेदवार कोण असेल याचीही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, शरद पवार गटात इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत तशी इच्छुकांची गर्दी वाढू लागली आहे. यानंतर आता आणखी कोण शरद पवार गटात प्रवेश करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत केलं मोठं वक्तव्य, ‘ही’ मागणी करत पाठिंबा केला जाहीर