Download App

साताऱ्यात मोठा ट्विस्ट! खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांत उमेदवार देण्यासाठी कमालीचे कौशल्य पणाला लागले आहे. त्यातून बऱ्याच राजकीय उलथापालथी होत आहेत. त्यात महायुतीने साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे. तर आता साताऱ्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. हा ट्विस्ट म्हणजे शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेतून माघार घेतली आहे.

तब्येत ठीक नसल्याच्या कारणामुळे श्रीनिवास पटलांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे आता श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्यानंतर साताऱ्यातून कोण उमेदवार असावा याबाबत पवार विधानसभा मतदारसंघ निहाय्यक बैठक घेणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. शरद पवार आज सातारा जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत.

Loksabha Election: गोविंदाची पुन्हा राजकारणात एन्ट्री! शिवसेनेत पक्षप्रवेश, उत्तर-पश्चिम मुंबईतून रिंगणात उतरणार?

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून सातारा लोकसभेसाठी श्रीनिवास पाटील, सारंग पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील माने सत्यजितसिंह पाटणकर या नावांची चर्चा आहे. तसेच श्रीनिवास पाटील यांनी देखील सारंग पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी. असा प्रस्ताव देखील दिला होता. त्यामुळे आता साताऱ्यातून कुणाला उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

श्रीनिवास पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. परंतु शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून उभं राहावं अशी मागणी देखील कार्यकर्त्यांमधून होत आहे. अशी माहिती साताऱ्यात बोलताना स्वतः शरद पवार यांनी दिली. कारण सातारा आणि म्हाडा ही लोकसभा मतदारसंघ मागील काही काळापासून राष्ट्रवादीचे बालेकिल्ले राहिले आहेत. गेल्यावेळी देखील काही महिन्यातच भाजपची वाट धरणाऱ्या उदयनराजेंना श्रीनिवास पाटलांनी पराभवाचा धक्का दिला होता.

Pune Loksabha : भाजपची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर! उमेदवारच बदलण्याची मागणी; काकडेंचा नाराजीचा सूर

तर दुसरीकडे साताऱ्यात उदयनराजे हे भाजपचे उमेदवार ठरत असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने साताऱ्याच्या जागेचा त्याग करण्याची तयारी दाखवली आहे. ही जागा काॅंग्रेसला देऊन तेथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना रिंगणात उतरविण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता ही जागा शरद पवार गटाकडे राहणार की, कॉंग्रेसकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us

वेब स्टोरीज