महेंद्र पंडित कोल्हापुरचे नवे एसपी, शैलेश बलकवडे आता पुण्यात

Kolhapur Police : बृहन्मुंबईचे पोलिस उपायुक्त महेंद्र कमलाकर पंडित यांची कोल्हापूर पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांची पुणे येथील राज्य पोलिस दलाचे समादेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महेंद्र पंडित 2013 मध्ये आयपीएस झाले आहेत. त्यानंतर भारतीय पोलिस सेवेत पोलिस अधिक्षकपदाचे प्रशिक्षण घेतले. नांदेडमध्ये त्यांनी दोन वर्षाच्या काळात पोलीस […]

UPSC Exam (8)

UPSC Exam (8)

Kolhapur Police : बृहन्मुंबईचे पोलिस उपायुक्त महेंद्र कमलाकर पंडित यांची कोल्हापूर पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांची पुणे येथील राज्य पोलिस दलाचे समादेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महेंद्र पंडित 2013 मध्ये आयपीएस झाले आहेत. त्यानंतर भारतीय पोलिस सेवेत पोलिस अधिक्षकपदाचे प्रशिक्षण घेतले. नांदेडमध्ये त्यांनी दोन वर्षाच्या काळात पोलीस उपअधिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोलीत अपर पोलीस अधिक्षक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी बजावल्याने पोलीस दालाकडून त्यांची दखल घेण्यात आली आहे. त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2018 प्राप्त झाले आहे. मुंबईत येण्यापू्र्वी ते नंदुरबारमध्ये कार्यरत होते.

Maharshtra Politics : मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला चिंता शिवसेना फुटीची

एसपी शैलेश बलकवडे गेल्या अडीच वर्षांपासून कोल्हापुरात कार्यरत होते. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून मोठी खांदपालट केली आहे. 18 पोलीस निरीक्षकांच्या (पीआय) 4 जिल्ह्यांतर्गत आणि चार बदल्या केल्या आहेत. पाच सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही बदली केल्या आहेत. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन आणि कार्यक्षमता सुनिश्च्त करण्यासाठी बदली करण्यात आली होती.

Exit mobile version