पोस्ट ऑफिसमधून महिला सन्मान बचतपत्र या योजनेस देशभर सुरुवात झाली आहे.
या योजनेच्या नगर शहरातील केडगावमधील पहिल्या बचतपत्राच्या मानकरी जयश्री कोतकर व दुसऱ्या मानकरी विनिता हजारे या ठरल्या आहे. या बचतपत्राचे वितरण अधीक्षक जी. हनी यांच्या हस्ते झाले.
पोस्ट मास्टर संतोष यादव यांनी या योजनेची प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत अवघ्या दीड महिन्यांत या योजनेचे शंभर खाते उघडण्याचा विक्रम अहमदनगर विभागात केला.
केंद्र सरकारने आझादी का अमृत महोत्सवानिमित्त खास महिला व मुलीकरिता सुरू केलेली आहे.
या योजनेचा सुरुवात 1 एप्रिल 2023 पासून संपूर्ण देशभरातील पोस्ट ऑफिसमधून झालेला असून सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत आहे.
पोस्ट ऑफिसच्या इतर अल्पबचत योजनेपेक्षा अधिक व्याजदर देणारी ही योजना आहे. यामध्ये फक्त महिला व मुलीच सहभागी होऊ शकतात. दोन वर्षांकरिता असणारी योजनेमध्ये कमीत कमी एक हजार तर जास्तीत जास्त दोन लाख रुपये गुंतवणूक करू शकता.
या योजनेस 7.50% व्याजदर आहे. एकच खातेदाराच्या नावे दोन नवीन खात्यामधील अंतर हे तीन महिने असणे गरजेचे आहे.
या योजनेची 16 मे ते 15 जून 2023 या दरम्यान अहमदनगर विभागातील सर्वच पोस्ट ऑफिसमध्ये विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जास्तीत जास्त महिला व मुलींनी यात सहभागी व्हावे असे आवाहन पोस्ट मास्टर संतोष यादव यांनी केले आहे.