Maratha reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात विविध प्रकारची आंदोलन सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील करंजी गावात (Kranji) सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
राज्यात बिअर विक्रीत मोठी घट! खप वाढवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन केलं होतं. तेव्हा उपोषणकर्त्यांवर लाठीहल्ला झाला होता. मात्र, मराठा समाज आपल्या मागण्यांवर ठाम होता. लाठीहल्ला होऊनही जरांगे पाटील मागे हटले नाहीत. त्याही परिस्थितीत त्यांनी उपोषण सुरू ठेवलं. दरम्यान, सरकारने नमतं घेत सराटी गावाला भेट दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी एका महिन्याचा वेळ मागितला होता. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. मात्र, अद्याप आरक्षण मिळालं नााही.
दरम्यान, आता करंजी गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली. चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष…. अशा आशयाचं बॅनर लावत जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय पक्ष आणि नेत्यांना ग्रामस्थांनी गावात प्रवेश बंदी केली आहे. सध्या हा फलक चर्चेचा विषय बनला आहे.
करंजी ग्रामपंचायतीचे उपसरपंच शिवाजी जाधव म्हणाले की, उपसरपंच पदावर मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे, पद गेले तरी चालेल मात्र, मागे हटणार नाही.
जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला कार्यकाळ २४ ऑक्टोबरला संपत आहे. त्यामुळे राज्यभरात मराठा समाज अधिकच आक्रमक होताना दिसत आहे. मनोज जरांगे यांनी शांततापूर्ण आंदोलन करण्याचं आवाहन केलं. दरम्यान राज्यभरात अनेक गावांनी राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे. सरकारला दिलेली मुदत संपण्यास अवघे ३ दिवस उरले आहेत. त्यामुळे या तीन दिवसांनंतर आरक्षण मिळणार की नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.