Download App

नगरकरांनो अलर्ट! हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा; येत्या दोन दिवसात जिल्ह्यात…

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सर्वत्र मुसळधार पावसाने (heavy rain) जोरदार हजेरी लावली. काही जिल्ह्यांना हवामान खात्याने (IMD) रेड अलर्ट दिला. दरम्यान, आज (मंगळवार) दुपारपासून अहमदनगर शहरात संततधार पाऊस सुरू आहे. अशातच भारतीय हवामान खात्‍याने अमहनगर जिल्ह्यात २५ व २६ जुलै २०२३ या कालावधीत वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे आणि मध्‍यम स्‍वरूपाच्‍या पर्जन्‍यमानाची शक्‍यता वर्तवली आहे. (Meteorological Department has issued alert warning For Amhandgarh district moderate rain 25th and 26th July)

जिल्‍हयातील विविध धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रामध्‍ये पर्जन्‍यमान सुरु असून अतिवृष्‍टी झाल्‍यास धरणाद्वारे सोडण्‍यात येणाऱ्या विसर्गामध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याने नदीकाठावरील नागरीकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेण्याची आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

सखल भागात राहणाऱ्या नागरीकांनी तातडीने सुरक्षीत स्‍थळी स्‍थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्‍याकाठच्‍या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्‍यास नागरिकांनी नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दुर रहावे व सुरक्षीत स्‍थळी स्‍थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्‍यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्‍यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्‍यासाठी गर्दी करु नये, असं या पत्रकात सांगण्यात आलं.

शिंदे-ठाकरे येणार आमने-सामने! ‘शिवसेने’साठी राहुल नार्वेकरांच्या दालनात होणार चकमक? 

तसंच जुनाट, मोडकळीस आलेल्‍या व धोकादायक इमारतीमध्‍ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्‍टीमुळे भूस्‍खलन होण्‍याची व दरडी कोसळण्‍याची शक्‍यता असते. त्‍यादृष्‍टीने डोंगराच्‍या पायथ्‍याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्‍यावी व वेळीच सुरक्षीत स्‍थळी स्‍थलांतर करावे. घाट रस्‍त्‍याने प्रवास करणे शक्‍यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्‍ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्‍यावी. नदीच्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहामध्‍ये उतरु नये. अचानक नदीच्‍या पाणीपातळीत वाढ झाल्‍यास जिवीतास धोका उद्भवू शकतो, असंही या पत्रकात नमूद केलं

धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्‍या खाली न थांबता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्‍यावा. आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्‍टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्‍वनी क्र.1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा, असेही पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Tags

follow us