Download App

पालकमंत्री विखे अॅक्शन मोडमध्ये; नगरमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’

  • Written By: Last Updated:

Minister Radhakrishna Vikhe Patil on law and order: गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या घटना घडल्या आहेत. नगर शहरामध्ये दोन ठिकाणी दगडफेकीचा घटना घडल्या आहेत. दोन समाजात होत असलेल्या वादानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची बैठक घेतली. समाजामध्ये अशांतता व तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.

‘बाळासाहेबांनी मला मोठं केलं तर, शरद पवार माझ्यासाठी’.. संजय राऊतांचे गौरवोद्गार

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, समाजामध्ये शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबरच समाजातील प्रत्येक नागरिकाची आहे. समाजातील शांतता कायम राखण्यासाठी प्रशासनाने कुठल्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे आपली भूमिका बजवावी.सार्वजनिकरित्या सण उत्सव साजरे करताना वर्गणी जमा करण्यात येते. वर्गणी जमा करण्यावरून अनेकवेळा वाद निर्माण होऊन समाजामध्ये अशांतता निर्माण होण्याचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे सण, उत्सव साजरे करण्यासाठी अंतर्गतरीत्या वर्गणी जमा केल्यास हे वाद होणार नाहीत. तसेच वर्गणी जमा करण्याची प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना पालकमंत्री विखे यांनी दिल्या आहेत.

Chandrapur News : मुलगा आमदार… आई विकते बांबूच्या टोपल्या…

समाजात तेढ निर्माण होऊन अशांतता पसरविण्यासाठी समाज माध्यमातून संदेश पसरविण्यात येतात. समाज माध्यमाचा गैरवापर करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील सायबर गुन्हे कक्षाचे अधिक प्रमाणात बळकटीकरण करण्यात यावे. यासाठी आवश्यक असणारा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल. असे आश्वासन विखे यांनी दिले आहे.

अहमदनगर शहरातील प्रत्येक चौकात येत्या 15 दिवसांत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. बंद असलेल्या पोलिस चौक्यांबरोबरच मोहल्ला समित्या कार्यान्वित कराव्यात. शहरात अथवा गावात अप्रिय घटना घडत असेल तर त्या घटनेची माहिती पोलिसांना वेळेत मिळण्यासाठी सर्वसामान्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात यावा, अशा सूचनाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस विभागाला दिल्या.
यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार लहू कानडे, पद्मश्री पोपटराव पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते.

Tags

follow us