डिंभे-माणिकडोह प्रकल्प : देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ ट्विटमध्ये चुकीची माहिती…

मुंबई : डिंभे-माणिकडोह प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन चुकीची माहिती प्रसारित केली असून ट्विटमध्ये दुरुस्त करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत केली आहे. डिंभे-माणिकडोह बोगद्याला मविआ सरकारच्या काळातच मंजुरी मिळाली असताना उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यालयाच्या अधिकृत twitter हँडलवर याबाबत अनवधानाने चुकीची माहिती देण्यात आल्याचा मुद्दा ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या […]

Rohit

Rohit

मुंबई : डिंभे-माणिकडोह प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन चुकीची माहिती प्रसारित केली असून ट्विटमध्ये दुरुस्त करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत केली आहे.

पवार म्हणाले, डिंभे-माणिकडोह प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात नाहीतर महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झाला आहे. याबाबत मी पाठपुरावा करुन मुख्यमंत्री कार्यालयाला प्रकल्पाच्या निधी आणि टेंडरसाठी पत्रही दिल्याचं आमदार पवार यांनी सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस ट्विटमध्ये म्हणाले, “पुणे व नगर जिल्ह्यातील पाणी वाद संपुष्टात आणणाऱ्या डिंभे माणिकडोह प्रकल्प बोगद्यासही मान्यता देण्यात आली. गेल्या 25 वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता”, असं ट्विट फडणवीसांनी केलं आहे.

गृह मंत्रालयाचा सोनिया गांधींना दणका; निकटवर्तीयाची सीबीआय चौकशी होणार

त्यानंतर काल विधानसभेत सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आमदार रोहित पवारांनी हा मुद्दा उपस्थित करत देवेंद्र फडणवीसांनी ट्विटमध्ये दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

या प्रकल्पाचा सर्वेदेखील झाला असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून कृष्णा खोऱ्याला पत्रही देण्यात आलंय. मात्र, कृष्णा खोऱ्याकडून अद्याप पुढील कार्यवाही करण्यात आलेली नाही.

ही अत्यंत महत्वाची योजना असून दीड लाख हेक्टर शेतीला पाणी देणारी योजना आहे. त्यामुळे लवकरात लवकर कृष्णा खोऱ्याकडून प्रस्तावाला मान्यता मिळण्याची मागणी रोहित पवारांनी यावेळी केलीय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाबाबत चुकीचं ट्विट केलं असून त्यांनी तत्काळ ट्विटमध्ये दुरुस्ती करावी, अशी मागणी पवार यांनी यावेळी केलीय.

दरम्यान, डिंभे-माणिकडोह प्रकल्पामुळे हजारो शेतकऱ्यांसह कुकडी प्रकल्पातील सर्वच तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी एक जादा आवर्तन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Exit mobile version