शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचं टेन्शन वाढणार आहे. कारण स्वराज्य संघटनेकडून रणशिंग फुंकण्यात आलं आहे. स्वराज संघटनेच्या पक्षबांधणीची सुरुवात झालीयं. स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे यांचा येत्या 6 ऑगस्ट रोजी सांगोला मतदारसंघात पहिलाच दौरा असणार आहे. या दौऱ्यादरम्यान सांगोला मतदारसंघात स्वराज्य पक्षाच्या शाखांची स्थापना संभाजीराजेंच्या हस्ते करण्यात येणार आहे. शाखांच्या स्थापनेनंतर संभाजीराजेंची जाहीर सभा देखील होणार आहे. त्यामुळे आता निवडणुकीमध्ये स्वराज्य संघटनेचा उमेदवार प्रतिस्पर्धी म्हणून शहाजीबापू पाटलांविरोधात असणार, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
https://letsupp.com/politics/jayant-patil-on-ctitiseze-shinde-fadnavis-pawar-over-crane-accident-samriddhi-74310.html
मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या राज्याच्या राजकारणावर संभाजीराजेंनी चिखलफेक करीत टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह सत्तेत जाण्याचा निर्णय घेतलायं, आता हे 9 मंत्री 9 महिन्यांसाठी सत्तेत जाऊन असा कोणता विकास करणार? असा संतप्त सवाल संभाजीराजेंनी केला होता. त्यानंतर आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी राज्यभर दौरा करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
या दौऱ्यामध्ये संभाजीराजे बैठका, शाखा स्थापना, आणि जाहीर सभेच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात कार्यकर्त्यांची बैठकाही सुरु झाल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधवांनी व्यक्त केली आहे.
India-Pakistan peace! बिथरलेला पाकिस्तान नरमला; भारताकडे केली चर्चेची मागणी
दरम्यान, आता सांगोल मतदारसंघात स्वराज्य पक्षाने रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे इथल्या स्थानिक सत्ताधारी नेत्यांसह आमदार शहाजीबापू पाटील यांना आगामी निवडणूक जड जाणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं आहे. पुढील काळात निवडणुका झाल्यास स्वराज्य संघटनेला मतदार पसंती देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या बैठकीला राज्य उपाध्यक्ष फत्तेसिंह सावंत, राज्य उपाध्यक्ष आप्पासाहेब कुढेकर पाटील, राहूल शिंदे, महादेव तळेकर, आशुतोष तोंडसे, पांडुरंग मोरे, विशाल केदार, सचिन महांकाळ, अशोक पवार, प्रफुल्ल क्षिरसागर, भाऊसाहेब जगताप, हनुमंत डुबल यांच्यासह सांगोला तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.