Download App

दुसरा हात का तोडला नाही ? नगरच्या एसपींसमोरच प्रसाद लाड यांचे प्रक्षोभक भाषण

  • Written By: Last Updated:

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील उंबरे गावात शाळकरी मुलींचे धर्मांतर प्रकरण उघडकीस आले आहे. त्यानंतर गावात राडा झाला आहे. या प्रकरणी दोन्ही गटातील आरोपींना अटक झालेली आहे. आता या गावात राजकीय नेते जावून परिस्थिती जाणून घेत आहे. विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही गावाला भेट दिली. त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये एक सभा झाली. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक राकेश ओला (IPS Rakesh Ola) यांच्यासमोर प्रसाद लाड यांनी आरोपीचा एकच हात तोडला दुसऱ्या का तोडला नाही, असे प्रक्षोभक भाषण केले. MLC Prasad Lad’ inflammatory speech in front of Ahmednagar sp)

यावेळी महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. प्रसाद लाड म्हणाले, उंबरे येथील घटना रात्री दीड वाजता कळली. त्यानंतर लगेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. अधिवेशनात हा विषय घेण्यात आला आहे. आमच्या मुलींच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे. आमच्या धर्माच्या आया-बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहाल तर त्या दिवशी डोळे हातात काढून दिले जाईल. या गुन्ह्यातील अटक झालेल्या आरोपीचा एक हात तोडला आहे. मी म्हणतो दुसऱ्या का तोडला नाही.

Hariyana Violence : आता हरियाणा पेटलं! जलाभिषेक यात्रेत जाळपोळ, जीव वाचवण्यासाठी लोकं मंदिरात…

बॉम्बस्फोटासाठी टेटर फंडिंग केले जात होते. त्याचप्रकारे लव्ह जिहादसाठी टेटर फडिंग केले जात आहे. यामागील धागेदोरे पोलिसांनी शोधले पाहिजे. अटक केलेल्या आरोपींवर एमपीडीएनुसार करावी, त्यासाठी पालकमंत्री विखे यांनी लक्ष घालावे. आरोपी सहा आठ वर्ष तुरुंगातून बाहेर आले नाही पाहिजे. यात आपले तेरा लोकही अटक झालेले आहेत. त्यांच्या जामीन कसा लवकर होईल हे पाहावे, असेही लाड म्हणाले.

लव्ह जिहादच्या घटना नगरमध्ये का घडतात ?

नगर जिल्ह्यात लव्ह जिहादच्या घटना का घडतात, याची चौकशी केली पाहिजे. कुणी व्यक्ती, पोलिस अधिकारी यात असतील, तर त्यांची चौकशी करून गुन्हे दाखल केले पाहिजे. लव्ह जिहादच्या घटना घडल्यास स्थानिक पोलिस स्टेशन, एलसीबीला जबाबदार धरले पाहिजे. त्यांना कुठेही काय सुरू आहे. हे सर्व कळते, अशी मागणीच लाड यांनी केली आहे. येथील परिस्थिती पाहण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मला पाठविले असल्याचे लाड यांनी आपल्या भाषणात सांगितले.

कर्डिलेंनी मनावर घेतलं तर पोलिसांची गरजच नाही

शिवाजी कर्डिले यांची ताकद, यंत्रणा मोठी आहे. कर्डिले यांनी मनावर घेतलं तर पोलिसांची गरज नाही. हिंदुना त्रास देणारे चड्डी काढून पळून जातील. कर्डिले तुम्ही सहा महिन्यात जेलमधून बाहेर आला. तुम्हाला घाबरून सोडून देण्यात आल्याचे लाड यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

Tags

follow us