अहमदनगर : आगामी निवडणुका पाहता अनेक पक्षांकडून पक्ष बळकटीकरणासाठी राज्याचे दौरे तसेच विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहे. यातच मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे देखील राज्याच्या दौऱ्यावर आहे. महासंपर्क अभियानासाठी अमित ठाकरे दोन दिवसांच्या नगर जिल्हा दौऱ्यावर आले. नगरचा दौरा आटपून ते शिर्डीसाठी रवाना झाले. मात्र त्यांच्या स्वागतासाठी राहता शहरात मनसैनिक चार तास वाट पाहत होते. मात्र अमित ठाकरे अवघे काही सेकंद थांबले व निघून गेले. कार्यकर्त्यांनी लावलेल्या नामफलकाचे अनावरण न केल्याने मनसे कार्यकर्ते (MNS) नाराज झाले. नाराज कार्यकर्त्यांनी थेट फलकावरील सजावट फाडून टाकत आपण राजीनामा देणार असल्याचे सांगितले. (MNS Activists angry with Amit Thackeray directly tore the poster)
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे दोन दिवसांच्या नगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथून नगरला आले होते. दरम्यान अमित ठाकरेंचे नेवासा येथे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच नगर शहरात देखील अगदी विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्यने मनसैनिकांनी गर्दी केली होती.
Virat Kohli: एका शतकासाठी विराटने 1019 दिवस वाट पाहिली, 315 दिवसांत झळकावली 8 शतके…
दरम्यान नगरचा दौरा आटपून ते शिर्डीसाठी रवाना झाले होते. आपले नेते येणार असल्याने मनसैनिकांमध्ये देखील एक वेगळाच उत्साह देखील पाहायला मिळाला. मनसे कार्यकर्त्यांनी शिर्डीजवळील राहाता शहरात अमित ठाकरेंच्या स्वागताची मोठी तयारी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताचे एक फलक देखील तयार केले होते व या फलकाला सुंदर असे सजवण्यात आले होते.
मात्र, अमित ठाकरे राहाता शहरात आले व त्यांनी केवळ 20 सेकंद हजेरी लावली. त्यांच्या या कृतीमुळे गेली अनेक तास थांबलेले काही कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले. स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने लावलेल्या मनसेच्या नामफलकाचे अनावरण न करताच अमित ठाकरे हे शिर्डीकडे रवाना झाले. यामुळे संतप्त झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याने नामफलकाचा कव्हर फाडला. तसेच आपण राजीनामे देणार असल्याची भावना काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.