Download App

मोदी शेतकऱ्यांना 6 हजार देतायत अन् 30 हजार रुपये काढून घेतायत

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : इंधनाचे वाढते दर, पेट्रोल- डिझेल तसेच गॅस सिलेंडरचे वाढते दर याला केंद्र सरकारच जबाबदार आहे. जनतेवरील महागाईचा बोजा कमी व्हावा यासाठी जनतेने मोदींना निवडून दिले. मात्र काँग्रेसच्या काळात 400 रुपयांना असलेले गॅस सिलेंडर मोदींच्या काळात अकराशे रुपयांवर पोहचली आहे. महागाईच्या आगीत जनता होरपळतेय याला कारण म्हणजे मोदी आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे माजी खासदार सुभाष वानखेडे (Subhash Bapurao Wankhede) यांनी मोदींसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ठाकरे गटाचे खासदार सुभाष वानखेडे हे अहमदनगरला आले होते. यावेळी एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी महागाईवरून मोदींवर जोरदार टीका केली आहे. यावेळी विनोद घोसाळकर (उपनेते), विजय कदम(उपनेते) , साईनाथ दुर्गे, उल्हास पाटील (माजी आमदार), शशिकांत गाडे( शिवसेना जिल्हाप्रमुख), रोहिणी शेंडगे(महापौर), आशा निंबाळकर, विक्रम राठोड, रवींद्र वाकळे, संदेश कार्ले, भगवान फुलसौंदर, रामदास भोसले , गिरीश जाधव आदींसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

मोदींच्या एका ड्रेसची किंमत 10 कोटी… ठाकरे गटाच्या माजी खासदाराची टोलेबाजी

पीएम किसान योजनेवरून मोदींवर टीका
देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्राने पंतप्रधान किसान योजना सुरु केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत केली जाते. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. एकीकडे खतांच्या किंमतीमध्ये वाढ केली. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतायत आणि त्यांच्या खिशातून 30 हजार काढतायत. 750 रुपयांची खताची गोणी आता 1750 रुपये केली. 30 गोण्यांमागे 30 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खिशातून जात आहे, अशा शब्दात वानखेडे यांनी मोदींवर हल्लाबोल केला.

Tags

follow us