Download App

भिक्षेकऱ्यांचा मृत्यू…जिल्हा रूग्णालयाचे CCTV फुटेज द्या, खासदार नीलेश लंकेंचे जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र

Nilesh Lanke Demands CCTV footage Of Ahilyanagar Civil Hospital : अहिल्यानगर जिल्हा रूग्णालयात (Ahilyanagar Civil Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या चार भिक्षेकऱ्यांचा मृत्यू (beggar death case) संशयास्पद आहे, असं सांगत खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तसेच उपचार केलेल्या आयपीडी पेपरची मागणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

ऑफीसमध्ये जा, आराम करा अन् लाखो रुपये पगार मिळवा.. ‘या’ कंपनीतील जॉबही खास

भिक्षेकरूंच्या मृत्यूनंतर खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा रूग्णालयात जात रूग्णालय प्रशासनाची झाडाझडती घेत संताप व्यक्त केला होता. जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या चार भिक्षेकरूंचा उपचारादरम्यान मृत्यू (Ahilyanagar News) झाला, ही घटना संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे खा. लंके यांचे म्हणणे आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत खा. लंके यांनी अपघात वॉर्ड नंबर 1, बेगर वॉर्ड,भिक्षेकरूंना ठेवण्यात आलेल्या किंवा उपचार केलेली खोली/वॉर्डमधील सीसीटीव्ही फुटेज, भिक्षेकरूंवर करण्यात आलेल्या उपचाराचा तपशील, आयपीडी पेपर/नोट्स यांची मागणी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे करण्यात आली आहे.

उदयनराजेंना महात्मा फुलेंचं महत्त्व कमी करायचं…, ‘त्या’ वक्तव्यावरून ओबीसी नेते संतापले

सीसीटीव्ही फुटेज आणि उपचारासंदर्भातील माहीती प्राप्त झाल्यानंतर सीसीटीव्हीमध्ये काही संशयास्पद आढळल्यास हा मुद्दा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून निष्पक्ष चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे खा. लंके यांनी सांगितले.
दरम्यान, खा. नीलेश लंके यांनी जिल्हा रूग्णालयास भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मारहाणीमुळे कैद्यांचा मृत्यू झाला असेल तर या घटनेच्या मुळाशी जावे लागेल असे सांगत हा प्रशासनाने घेतलेले हे बळी असून मयत भिक्षेकरूंचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रूग्णालयात करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने खा. लंके यांनी या माहीतीची जिल्हा शल्यचिकित्सकांकडे मागणी केली आहे.

शिर्डी येथे पकडण्यात आलेल्या चार भिक्षेकरांचा अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली. शनिवारी शिर्डी येथे नगरपंचायत आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली होती. या कारवाईत 51 भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी काही भिक्षेकरांना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे ठेवलं होतं. तर त्यातील 10 भिक्षेकर्‍यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. मात्र त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला.

follow us