Download App

‘ही दोस्ती तुटायची नाही…’; विखे – जगताप पुन्हा एकत्र

  • Written By: Last Updated:

Sujay Vikhe And Sangram Jagtap : सत्ताधारी आणि विरोधक हे राज्यात असो वा केंद्रात एकमेकांवर नेहमीच टीका टिप्पणी करत असतात. तसेच एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप हे करत असतात. असे असले तरी मात्र नगर जिल्ह्यात काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळते आहे. नगरमधील भाजपचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) हे नगरच्या विकासासाठी अनेकदा एकत्र असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. आता पुन्हा एकदा एका विकासकामासाठी विखे – जगताप हे एकत्र दिसून आले. विळद ते वाळुंज बायपास वरील केडगाव चौफुला येथील उड्डाणपुलाचे (Kedgaon Chauphula flyover) लोकार्पणसाठी हे दोन्ही नेते एकत्र आले होते. (MP Sujay Vikhe and MLA Sangram Jagtap together)

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून डॉ. सुजय विखे तर राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी केली. निवडणुकीनंतर विखे हे खासदार होऊन दिल्लीत गेले, तर त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत नगरच्या विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे निवडून येऊन आमदार झाले.

दरम्यान निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढणारे डॉ. सुजय विखे पाटील व संग्राम जगताप यांची मैत्री अवघे नगरकर जाणताहेत, पाहताहेत. विकासकामासाठी हे दोघे एकत्र येत असतात हे जनतेने पहिले आहे. काही महिन्यांपूर्वीच नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाची पाहणीसाठी हे दोघांनी एकाच गाडीतून प्रवास देखील केला होता. तसेच उड्डाणपूल सोहळ्यात राष्ट्रवादीचे असले तरी आ. जगताप हे पहिल्या रांगेत होते. खा. विखे यांनी आ. जगताप यांचा नितीन गडकरी यांच्याशी ‘खास परिचय’ करून दिला होता.

इजिप्तच्या ऐतिहासिक अल-हकीम मशिदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पाहा फोटो 

आता पुन्हा एकदा अशाच एका विकास कामासाठी खासदार विखे व आमदार जगताप हे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. नुकतेच विळद ते वाळुंज बायपास वरील केडगाव चौफुला येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण अहमदनगरचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते व जिल्हाबँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. विशेष म्हणजे या विकासकामांचे श्रीफळ आमदार जगताप यांनी फोडले तर फीत खासदार सुजय विखे यांनी कट केली. यावेळी पुन्हा एकदा विकासकामासाठी दोन विरोधक एका मंचावर आल्याचे नगरच्या जनतेने पहिले.

 

Tags

follow us