Download App

Sujay Vikhe : ‘त्या’ एमआयडीसी वादात कोणी मूळ मुद्द्यावर बोलतच नाही, मी उडी मारली तर…

  • Written By: Last Updated:

MP Sujay Vikhe On Rohit Pawar : गेल्या काही दिवसांपासून कर्जत-जामखेड येथील एमआयडीसीच्या (Karjat-Jamkhed MIDC) प्रश्नावरून आमदार रोहित पवार (Rohit Pawar)चांगलेच आक्रमक झाले आहेत. एमआयडीसीच्या प्रश्नाबाबत त्यांनी विधीमंडळ परिसरात आंदोलनही केलं होतं. याच एमआयडीसीच्या मुद्द्यावरून राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात वाद पेटला. दरम्यान, आता खा. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी यावर भाष्य केलं. हा वाद आधी संपू द्या, नंतर मी यावरील उपाययोजनांवर बोलेन. वादात तिसऱ्यांनी उडी मारली तर वाद चिघळेलं, असं ते म्हणाले. (MP Sujay Vikhe Speak On Rohit Pawar over Karjat Jamkhed MIDC)

https://www.youtube.com/watch?v=qnJFFUhQCYQ

नगर येथील रेल्वे स्थानकावर अमृत भारत स्टेशन योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुजय विखे हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संपल्यानंतर खासदार विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विखे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी कर्जत – जामखेड एमआयडीसीच्या वादावर देखील भाष्य केले. विखे म्हणाले, एमआयडीसीचा हा वाद आधी संपू द्या. त्यानंतर मी यावरील उपाययोजनावर भाष्य करेल. तसेच या वादात तिसऱ्यांनी उडी मारली तर वाद आणखी उफाळून येईल. हा वाद दोन आमदारांमध्ये आहे. यावर अनेक टीका टिपण्णी झाली आहे. वादामध्ये कोणी मूळ मुद्द्यावर बोलतच नाही आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुजय विखे यांनी दिली आहे.

जयंत पाटीलही शरद पवारांची साथ सोडणार ? पुण्यात अमित शाह-जयंत पाटलांची भेट 

एमआयडीसी कोणी मंजूर केली, कधी केली, कशी केली… हा काही चर्चेचा विषयच नाही आहे. मूळ मुद्दा हा आहे की या एमआयडीसीमध्ये किती प्रकल्प आले आहे? किंवा किती जणांनी एमआयडीसीमध्ये उद्योग सुरु करण्यासाठी अर्ज केले आहे, हे देखील पाहणे महत्वाचे आहे. आपल्याला राहुरी, श्रीरामपूर सारखी एमआयडीसी करायची आहे तर ती नगरमध्ये देखील होऊ शकते. नुसतेच यासाठी आरक्षण टाकून प्लॉट विकणे म्हणजे एमआयडीसी होत नाही. त्याठिकाणी किती उद्योग धंदे आले हे पहिले महत्वाचे आहे. म्हणून केवळ एमआयडीसी झाली म्हणजे तरुणांना रोजगार मिळेल असे होत नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार सुजय विखे यांनी मांडली.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कर्जत – जामखेड एमआयडीसी वाद हा चांगलाच चिघळला आहे. पावसाळी अधिवेशनात देखील यामुद्द्यावरून चांगलेच घमासान झाले. भाजप आमदार राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहे. उद्योगमंत्र्यांच्या भेटीगाठी झाल्या मात्र हा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे. यावरून आता राजकारण तापले आहे.

Tags

follow us