Download App

नगर जिल्हा बॅंक : मते फुटल्याने राष्ट्रवादीत भांडणे… राजेंद्र फाळकेंच्या हकालपट्टीची मागणी!

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच झाली. अध्यक्ष पदासाठी झालेल्या या निवडणुकीत माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांचा अवघ्या एका मताने पराभव करत विजय मिळवला. दरम्यान या निवडणुकीत सदस्य फुटल्याने घुले यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व संजय कोळगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व जिल्हा सहकारी बँकेतील फुटीर संचालकांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वीच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले यांना धोबीपछाड देत विजय मिळवला. यावरून राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे पदाधिकारी संतापले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व संजय कोळगे यांनी पत्रकार परिषद घेत राजेंद्र फाळके यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, बँकेत सर्वाधिक संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे व बहुमत महाविकास आघाडीचे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांचा पराभव झाला होता. त्यामुळे पवार व कोळगे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व जिल्हा सहकारी बँकेतील फुटीर संचालकांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.

OYO Founder : ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे 20 व्या मजल्यावरून पडून निधन

कपिल पवार म्हणाले, की अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदासाठी चंद्रशेखर घुले यांच्यासह राहुल जगताप, भानुदास मुरकुटे, प्रशांत गायकवाड हे इच्छुक होते. मात्र पक्ष आदेश देईल त्याचेच काम करण्याचे ठरले होते. पक्षाच्या वतीने घुले यांचे नाव ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी निश्चित केले होते. मात्र त्यानंतर पाच सदस्य फुटल्याने महाविकास आघाडीचा पराभव झाला असा आरोप कपिल पवार यांनी केला.

अजितदादांना धक्का दिल्यानंतर फडणवीस हे रोहित पवारांच्या विरोधात बार उडविणार…

तसेच यावेळी बोलताना कोळगे म्हणाले, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीवेळी जिल्हाध्यक्ष फाळके यांना जिल्ह्यातील घडामोडी माहिती असायला हवा होत्या. मात्र त्यांनी ती माहिती वरिष्ठ नेत्यांकडे न देता त्याकडे दुर्लक्ष केले. गद्दार संचालकांसह जिल्हाध्यक्ष फाळके यांची हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

Tags

follow us