Nana Patole On Shinde-Fadnavis Sarkar : आरक्षणाचे आश्वासन देत सरकार मराठा, धनगर आणि ओबीसींना खेळवण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Sarkar)करीत आहे. जो भेटेल त्याला आरक्षण देतो असे सांगून भाजप सर्वांना फसवत आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केली. ओबीसी कार्यकर्त्यांचा मेळावा (Gathering of OBC workers)इस्लामपूरच्या (Islampur) राजारामबापू नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पटोले यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे.
सीएसआरडीमध्ये सदाशिव अमरापूरकर यांच्या स्मृतींना देणार उजाळा
यावेळी ते म्हणाले की, जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी कॉंग्रेसच्या अधिवेशनात ठराव करण्यात ठराव करण्यात आला असून त्यामुळे बहुजन समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निधीची तरतूद करणे बंधनकारक असणार आहे. मात्र भाजपला कोणालाच काही द्यायचे नाही. यामुळे जातनिहाय जनगणना टाळली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच घटनेत यासाठी तरतूद केली आहे. समाजातील गरीब वर्गालाही प्रगतीची संधी मिळाली पाहिजे ही कॉंग्रेसची भूमिका असल्याचे यावेळी नाना पटोले म्हणाले आहेत.
नोटबंदीमुळे काळा पैसा येईस असे सरकारकडून सांगण्यात आले, मात्र काळेधन आलेच नाही, ही फक्त शुद्ध फसवणूक होती. तसेच जीएसटी म्हणजे सर्वसामान्य जनतेची लूट आहे. याला विरोध म्हणूननच आपण भाजपचा त्याग केला आहे. ज्या मतावर आपण निवडून जाणार, त्यांचेच जर खिसे कापण्याचे उद्योग करु लागलो तर जनतेच्या प्रति आपले दायित्व काय? असाही सवाल नाना पटोले यांनी केला आहे.
अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान होत आहे. अन्नदात्याला मदत करण्याची सरकारची भावनाच नाही. शेतकरी आत्महत्या करत आहे. तरीदेखील सरकार त्यांना मदत करण्यासाठी पुढे येत नाही. जीएसटीमुळे सर्वसामान्य करदाता झाला आहे. ज्याला एकवेळच्या जेवणाची भ्रांत आहे, अशा लोकांचे गळे आणि खिसे कापण्याचे काम हे सरकार करीत असल्याने त्यांचा शाप या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही, असेही कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.