Download App

MIDC ची मागणी करतोय तर तुमच्या पोटात का दुखतं?, NCP कार्यकर्त्यांचा शिंदेना थेट सवााल

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : कर्जत – जामखेड एमआयडीसी (Karjat – Jamkhed MIDC) प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यामध्ये या प्रश्नावरून जोरदार राजकीय युद्ध पेटले आहे. यातच आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादीच्या वतीने आज कर्जत- मिरजगाव – खर्डा अशा विविध ठिकाणी आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी राम शिंदे यांचा निषेध करत एमआयडीसी झालीच पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान रास्तारोको आंदोलनामुळे रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. (NCP Activist rasta roko aandolan and critisize bjp leader ram shinde)

दरम्यान कर्जत – जामखेडच्या एमआयडीसीचा प्रलंबित प्रश्न विधानसभेत गाजत असला तरी त्याचे पडसाद मात्र तालुक्यात दिसत आहेत. केवळ सरकारच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या एमआयडीसी बाबतचा मुद्दा राष्ट्रवादीने चांगलाच उचलून धरला आहे. याला मंजुरी मिळत नसल्याने कर्जत जामखेड तालुक्यातील पाच ठिकाणांसह सोलापूर नगर महामार्गावरील मिरजगाव येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी आज (गुरुवार) रास्ता रोको आंदोलन केले.

पाकिस्तानवर उपासमारीची वेळ, ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 99व्या क्रमांकावर घसरण 

यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आम्ही जगातील वेगळं असं काही आश्चर्य मागत नाही आहे. आम्ही आमच्या हक्काची मागणी करत आहोत. आमच्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावं, आमच्या रोजगाराचा प्रश्न मिटावा यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. आम्ही एमआयडीसीची मागणी करत आहोत तर तुमच्या पोटात काय दुखतंय असा थेट सवाल देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

यावेळी पुढे बोलताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणाले, राम शिंदे म्हणतात की, 25 वर्षांपासून ही मागणी केली. मात्र तुमच्याकडून तर हा प्रश्न मार्गी लागला नाही. मात्र आमदार रोहित पवार यांनी अवघ्या दोन वर्षात हा मुद्दा उचलून धरून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोणी कितीही विरोध केला तरी आम्ही आमच्या हक्काची एमआयडीसी मंजूर झालीच पाहिजे, अन्यथा येत्या काळात मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

एमआयडीसीवरून शिंदे – पवार भिडले
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील एमआयडीसीचा प्रश्न सध्या कमालीचा चर्चेत आहे. अधिवेशनात विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहात एमआयडीसी मुद्द्यावरुन प्रश्न विचारले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) स्थानिक आमदार रोहित पवार आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांनी या मुद्द्यावरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले आहेत. आपल्या मतदारसंघात एमआयडीसी होत नाही त्यामागे राम शिंदेच आहेत असा आरोप आरोप आ. पवार यांनी केला होता. त्यांच्या या आरोपावर विधानपरिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Tags

follow us