पंढरपूर : “काल एक मोहोळचा पोपट इथे येऊन खूप बोलून गेला. पण आजच्या उत्साहाच्या प्रसंगी काय बोलणार नाही. भालके काय चीज आहे ते या पोपटाला उद्यापासून दाखवतो”, असे म्हणतं भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केलेल्या भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांचं नाव न घेता टीका केली. ते आज (27 जून) सरकोली, तालुका पंढरपूर येथे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव आणि बीआरएसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. (NCP leader Bhagirath Bhalke joins Bharat Rashtra Samiti party)
#WATCH | Several leaders from Maharashtra join BRS Party in the presence of Chief Minister K. Chandrashekar Rao, at Sarkoli, in Solapur pic.twitter.com/1dDxImAQus
— ANI (@ANI) June 27, 2023
तेलगंणामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना अतिशय चांगल्या आहेत. शेतकऱ्यांना वीमा, वारसांना मदत, अवजारांसाठी मदत, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, दिली जाते. 2014 ला हे राज्य निर्माण झाले आणि अवघ्या 9 वर्षांत त्यांनी राज्याचा विकास केला आहे. महाराष्ट्रात कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांना काहीच दिले नाही. महाराष्ट्रातील शेतकरी दिवसा वीज मागत आहे, पण तीही दिली जात नाही. दलित बांधवांना व्यवसाय करण्यासाठी 10 लाख रुपयांची मदत केली जाते. केसीआर सांगतं असतात, महाराष्ट्रामें धन की नही मन की कमी आहे. त्यामुळे बीआरएस ही शेतकऱ्यांच टीम आहे, कोणत्याही पक्षाची टीम नाही.
भारत राष्ट्र समिती हा तेलंगणापुरता मर्यादित पक्ष असल्याची टीका केली जाते. पण आमचा पक्ष तेलंगणा आणि महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. बीआरएस राष्ट्रीय पातळीवर विस्तारलेला पक्ष आहे.
भगीरथ भालके हे विधानसभेला कसे निवडून येतात, तेच आम्ही बघतो, असा थेट इशारा उमेश पाटील यांनी दिला होता. भगीरथ भालके यांच्या बीआरएस पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सोमवारी पंढरपुरात बैठक झाली. या बैठकीत बोलताना पाटील बोलत होते. भगीरथ भालके हे विधानसभेसाठी लागणाऱ्या खर्चाच्या यंत्रसामुग्रीच्या लालसेपोटी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून बीआरएस पक्षात गेले आहेत. त्यांच्यामुळे राष्ट्रवादीवर कोणताही परिणाम होणार नाही, असंही त्यांनी म्हंटलं होतं.